मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : जळगावात केळी पट्ट्यात इराणच्या खरेदीदारांची पाहणी

इराणमधील केळीचे खरेदीदार, आयातदार यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा आदी भागांत नुकतीच भेट दिली. त्यांनी केळीच्या शिवारात जाऊन केळीचा दर्जा, स्थिती आदींची माहिती घेतली, तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

Team Agrowon

Banana Market Update जळगाव : इराणमधील केळीचे खरेदीदार (Banana Buyers), आयातदार (Banana Importer) यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा आदी भागांत नुकतीच भेट दिली. त्यांनी केळीच्या शिवारात जाऊन केळीचा दर्जा, स्थिती आदींची माहिती घेतली, तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

इराणमधील खरेदीदार मुजफ्फर लुफ्ती यांनी यावल तालुक्यातील हिंगोणा, वड्री भागात केळी बागांची पाहणी केली. लुफ्ती यांना इराणमध्ये १०० ते १५० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळी रोज हवी असते.

यासंदर्भात त्यांनी जळगावात येऊन पाहणी केली. यात केळी पक्व होत आहे. तिचा दर्चा चांगला आहे. परंतु काढणी मार्चमध्ये वेग घेईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

तसेच काही बागांना थंडीची बाधा (चिलिंग इंज्युरी) झाल्याचे दिसून आले. जमिनीतून दिले जाणारे पाणी किंवा फवारणीच्या मदतीने केळीतील चिलिंग इंज्युरीची समस्या थांबविता येईल का, यावर लुफ्ती व शेतकरी यांच्यात चर्चा झाली. लुफ्ती यांनी जळगावातील केळी खरेदीत रस दाखविला.

सुमारे पाच तास या भागात त्यांनी पाहणी केली. लुफ्ती यांच्यासोबत शेतकरी तथा अभ्यासक अमोल जावळे, नारायण चौधरी, गणेश नेहेते व इतर स्थानिक केळी उत्पादक उपस्थित होते.

खानदेशात निर्यातीच्या केळीला प्रति क्विंटल ३१२५ रुपये दर जागेवर मिळत आहे. रोज तीन कंटेनर केळीची आखातात निर्यात होत आहे.

मार्चमध्ये जिल्ह्यातून केळीची आयात करण्याचे लुफ्ती यांनी संकेत दिले. यामुळे केळीचे दर टिकून राहतील, असेही सांगण्यात आले.

इराणमधील केळी खरेदीदाराने जळगाव जिल्ह्यात पाहणी केली असून त्यांना मोठ्या प्रमाणात केळी हवी आहेत. यामुळे यंदा केळीची निर्यात वाढेल, अशी अपेक्षा आहे. परंतु ज्या भागात केळीत चिलिंग इंज्युरीची समस्या आहे, त्याबाबत त्रिची (तमिळनाडू) येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने संशोधन करून समाधान करायला हवे. यामुळे निर्यातक्षमता वाढू शकेल.

- अमोल जावळे, केळी उत्पादक तथा अभ्यासक, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Survey: खरडलेल्या जमिनीचा पंचनामा कसा करणार

Marwadi Mindset: शेतीत हवी ‘मारवाडी मानसिकता’

Shivraj Singh Chauhan: शेतकऱ्यांना मदत करण्यात कुचराई करणार नाही

Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन खरेदी रद्द : उपमुख्यमंत्री पवार

Sugarcane Rate: ऊसदराच्या कोंडीवर तोडगा नाही

SCROLL FOR NEXT