Agriculture Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Export : कृषी, प्रक्रियायुक्त अन्न निर्यातीत भारताची आघाडी

Agriculture And Process Food : भारताने मागील हंगामात कृषी निर्यातीत चांगली कामगिरी केली. २०२२-२३ या वर्षात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न निर्यातीत ९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Team Agrowon

Pune News : भारताने मागील हंगामात कृषी निर्यातीत (Agriculture Export) चांगली कामगिरी केली. २०२२-२३ या वर्षात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न निर्यातीत (Processed Food Export ९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

यात तांदूळ, फळे आणि भाजीपाला, पशुधन आणि डेअरी उत्पादनांचा समावेश राहिला. या वर्षात भारताने २ हजार ६३० कोटी डॉलरची निर्यात केली आहे. तर ‘अपेडा’अंतर्गत झालेल्या निर्यातीने २ हजार ३५६ कोटी डॉलरचे उद्दिष्ट गाठले आहे.

भारत जगातील महत्त्वाचा तांदूळ निर्यातदार देश आहे. एकूण जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा ४५ टक्के आहे. मागील वर्षापासून जागतिक बाजारात तांदळाची मागणी वाढली होती.

पूर्व आशियातील देश, आफ्रिका आणि युरोप तसेच पाकिस्तानमधील पुरामुळे तांदळाला मागणी वाढली होती. तांदूळ निर्यातदार देशांमध्ये भारताच्या तांदळाचे दर कमी होते.

परिणामी येथील तांदळाला चांगला उठाव मिळून निर्यात वाढली. भारताने जवळपास ७५ देशांना तांदूळ निर्यात केली होती.

तांदूळ निर्यातमूल्यात १५ टक्के वाढ

‘डायरेक्टरेट जनरल ऑफ कमर्शिअल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्स’च्या मते, भारताच्या तांदूळ निर्यातीचे मूल्य १५ टक्क्यांनी वाढले आहे. भारताने १ हजार ११० कोटी डॉलरचा तांदूळ निर्यात केला.

भारताने तुकडा तांदूळ निर्यातीवर बंद घातली होती. तसेच पांढऱ्या तांदूळ निर्यातीवर २० टक्के निर्यातशुल्क लावले होते. तरीही निर्यात ५ टक्क्यांनी वाढून २२३ लाख टनांवर पोचली होती.

फळे, भाजीपाला निर्यात वाढली

भारताची ताजी आणि प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला निर्यातही लक्षणीय वाढली. कोरोनानंतर जागतिक बाजारात फळे आणि भाजीपाला मागणी वाढली आहे. याचा फायदा भारताला होताना दिसत आहे.

भारताची निर्यात जवळपास १९ टक्क्यांनी वाढून ३८० कोटी डॉलरवर पोचली. तसेच तृणधान्य आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादनांची निर्यात २० टक्क्यांनी वाढली. भारताने वर्षभरात ४३० कोटी डॉलरचे तृणधान्य आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादनांची निर्यात केली.

मांस, डेअरी, पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीत घट

भारताची मांस, डेअरी आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात काही प्रमाणात कमी झाली. मागील वर्षात देशातील पशुधनावर विविध रोगांचे संकट आले होते. कोरोना काळात पशुधनाचे प्रजनन कमी झाले.

तर लम्पी स्कीनमुळे गोवंशावर परिणाम झाला. यामुळे देशातील दूध उत्पादन घटून तुटवडा निर्माण झाला. त्याचा परिणाम निर्यातीवर जाणवला. भारताने वर्षभरात ४०० कोटी डॉलरची मांस, डेअरी आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT