Agriculture Export : भारतातून तांदूळ, भाजीपाला, कडधान्ये निर्यात वाढली

देशातून यंदा कृषी आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात उद्दीष्टापेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे.
Rice Production
Rice ProductionAgrowon

Pune News : भारतीय कृषी आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात यंदा मोठ्या प्रमाणात वाढली. यंदा भारतातून बिगर बासमती तांदूळ (Basmati rice), बासमती तांदूळ, ताजा भाजीपाला (Vegetable), पोल्ट्री उत्पादने (Poultry Production), कडधान्ये (Millet) आणि डेअरी उत्पादनांची निर्यातीत वाढ झाली. एप्रिल ते जानेवारी या १० महिन्यांमध्ये भारताची निर्यात १० टक्क्यांनी वाढल्याचे अपेडाने स्पष्ट केले.

देशातून यंदा कृषी आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात उद्दीष्टापेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. अपेडाने यंदा २ हजार ३५६ कोटी डाॅलर निर्यातीचे उद्दीष्ट ठेवले होते.

पण चालू आर्थिक वर्षातील निर्यात २ हजार ६०० कोटींचा टप्पा गाठू शकते, असा विश्वास अपेडाने व्यक्त केला. गेल्या हंगामात देशातून २ हजार ४०० कोटी डाॅलरची कृषी आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात केली होती.

Rice Production
Nutritious Millet : पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व

चालू वर्षात पहिल्या १० महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते जानेवारी या काळात देशातून २ हजार १७९ कोटी डाॅलरची निर्यात झाली होती. तर मागील वर्षात याच काळातील निर्यात १ हजा ९७५ कोटी डाॅलरची होती. म्हणजेच यंदा पहिल्या १० महिन्यांतील निर्यात १० टक्क्यांनी वाढली.

केंद्राने तुकडा तांदूळ निर्यातीवर बंद घातली, तसेच पांढऱ्या तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लावले तरी बिगर बासमती तांदूळ निर्यातीची प्रगती चंगली राहिली. बिगर बासमती तांदूळ निर्यात यंदा तीन टक्क्यांनी वाढून ५१७ कोटी डाॅलरवर पोचली.

तर मागील हंगामात बिगर बासमती तांदूळ निर्यात ५०१ कोटी डाॅलरची निर्यात झाली होती. गेल्यावर्षी १४० लाख टन बिगर तांदूळ निर्यात झाला होता. त्यात यंदा ४ टक्क्यांनी वाढ होऊन १४५ लाख टनांची निर्यात झाली.

बासमती तांदळाची निर्यात ४१ टक्क्यांनी वाढली

यंदा भारतातून होणारी बासमती तांदूळ निर्यात ४१ टक्क्यांनी वाढली आहे. बासमती तांदूळ निर्यात ३८२ कोटी डाॅलरवर पोचली. रुपयात हे मुल्य ३० हजार ५१४ कोटी रुपये होते.

तर टनांमध्ये बासमती निर्यात १८ टक्क्यांनी वाढून ३६ लाख ६० हजार टनांपर्यंत वाढली. तर एकूण तांदूळ निर्यात (बासतमी आणि बिगर बासमती) १६ टक्क्यांनी वाढून ८९८ कोटी डाॅलरवर पोचली.

Rice Production
Onion bajarbhav : कांदा प्रश्नावरील तोडग्याबाबत स्वतंत्र भारत पार्टीचे समितीला निवेदन

भाजीपाला निर्यात वाढली, फळांची निर्यात घटली

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी या १० महिन्यांमध्ये भारतातून ताजा भाजीपाला निर्यात वाढली. ताजा भाजीपाला निर्यात ११.५ टक्क्यांनी वाढली. निर्यातीचे मुल्य ७५ हजार कोटी डाॅलरवर पोचली.

तर ताजी फळे निर्यात तीन टक्क्यांनी कमी राहून ५३ हजार कोटी डाॅलरपर्यंत घसरली. कडधान्य निर्यात ७३ टक्क्यांनी वाढून ४७ हजार कोटींवर पोचली. तसेच डेअरी उत्पादनांची निर्यात १० टक्क्यांनी वाढून ५१ हजार कोटींपर्यंत वाढली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com