Food Security Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Food Security : भारताची अन्नधान्य स्वयंपूर्णता टिकाऊ नाही

खाद्यतेल आणि कडधान्य वगळली तर आपण अन्नधान्याच्या बाबतीत बऱ्यापैकी स्वयंपूर्ण आहोत. मात्र ही स्वयंपूर्णता टिकाऊ नाही. आपलं निम्म्याहून अधिक लागवड क्षेत्र कोरडवाहू आहे.

राजेंद्र जाधव

पुणेः खाद्यतेल (Edible Oil) आणि कडधान्य (Pulses) वगळली तर आपण अन्नधान्याच्या बाबतीत बऱ्यापैकी स्वयंपूर्ण (Self Sufficiency In Food Grain) आहोत. मात्र ही स्वयंपूर्णता टिकाऊ नाही. आपलं निम्म्याहून अधिक लागवड क्षेत्र कोरडवाहू (Rain Fed Land) आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या (Monsoon) बेभरवशाच्या पर्जन्यमानावर (Rainfall) स्वयंपूर्णता टिकून आहे. मॉन्सूनएवढी जटील आणि अंदाजामध्ये फसवणारी जगात दुसरी कुठलीच हवामानप्रणाली नाही.

मॉन्सूनच्या पर्जन्यमानाबद्दल भारतीय हवामानशास्त्रज्ञ विभागासोबत जगातील प्रमुख देशांतील संस्था अंदाज देत असतात. मात्र आपला देश अवाढव्य असल्यानं केवळ देशात किती पाऊस पडणार या अंदाजाचा शेतकऱ्यांना पिकांचं नियोजन करताना उपयोग होत नाही. कारण अगदी जिल्ह्यात जरी सरासरीएवढा पाऊस पडला तरी दोन तालुक्यांत तो सरासरीएवढा होईल याची खात्री नाही.

एका तालुक्यात दुष्काळ, तर दुसऱ्या तालुक्यात अतिवृष्टीनं पिकं खराब झाल्याची उदाहरणं पुष्कळ सापडतात. शेतकऱ्यांना सध्या किमान जिल्हावार अंदाजाची गरज आहे. मात्र सध्या तो कोणीच देत नाही. संपूर्ण देशासाठीचा अंदाज शेतकऱ्यांसाठी किती कुचकामी असतो याचा अनुभव या वर्षी देशानं घेतला.

संपूर्ण देशात सरासरी पाऊस किती झाला, यापेक्षाही त्याचं वितरण कसं झालं हा मुद्दा कळीचा ठरतो. पावसाचं समान वाटप न झाल्यामुळे या वर्षी देशातील काही भागात दुष्काळ आणि तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांत जून-जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या. तर दुसरीकडं दक्षिणेकडील राज्यांत अतिवृष्टीमुळे पेरणीसाठी वापसा येत नव्हता.

महाराष्ट्रात तर मराठवाड्यासारख्या ठिकाणी परिस्थिती आणखीनच भयावह होती. हंगामाच्या सुरुवातीला पावसानं खंड दिल्यानं पेरण्या लांबल्या. त्यानंतर नुकत्याच उगवून आलेल्या पिकांना जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा फटका बसला. त्यानंतर पिके पक्व होताना सलग चार आठवडे पावसानं दडी मारल्यामुळे उत्पादकता घटली. उत्तर भारतातील राज्यांत पेरणीच्या वेळी अल्पसा पाऊस झाला. मात्र काढणीच्या वेळी धुवाधार पाऊस होत असल्यानं भात, सोयाबीनसारखी काढणीला आलेली पिकं खराब होत आहेत.

भारतीय शेती पूर्णतः मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. या पावसाचं आगमन आणि वितरण यांत वर्षागणिक टोकाचे बदल होत असल्यानं सरासरी एवढं उत्पादन काढणंगी शेतकऱ्यांसाठी अवघड झालं आहे. दिवस-रात्र मेहनत करूनही शेतकऱ्यांना परताव्यासाठी नशीबावर विसंबून राहावं लागत आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणी हा नियम झाला आहे. अशा परिस्थितीत तोकडं भांडवल असलेला अल्पभूधारक शेतकरी तग धरून राहणं कठीण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT