Turmeric
Turmeric Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric : हळद निर्यातीत भारत अव्वल

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः भारत जगातील सर्वांत मोठा हळद उत्पादक (Turmeric Producer) देश आहे. गेल्या तीन वर्षांपासून देशातून हळदीच्या निर्यातीत (Turmeric Export) वाढ होत असल्याचे चित्र आहे. २०२०-२१ मध्ये देशातून १ लाख ८३ हजार ८६८ टन हळदीची निर्यात (India's Turmeric Export) झाली असून, २१-२२ मध्ये आतापर्यंत १ लाख ५३ हजार १५४ टन इतकी हळद सातासमुद्रापार पोहोचली असून, दोन लाख टन हळदीची निर्यात शक्य असल्याचा अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

देशात सर्वाधिक हळदीचे उत्पादन होते. गुणवत्ता आणि हळदीचा दर्जा चांगला असल्याने परदेशातून हळदीला चांगली मागणी असल्याने निर्यातही चांगली होत आहे. गेल्या काही वर्षांत जगभरात हळदीचा वापर वाढला आहे. आयुर्वेदाचा प्रसार वाढला आहे. देशातून आखाती देश, दुबई, युरोपियन देश, युनायटेड अरब यासह अन्य परदेशात हळदीची निर्यात होते. २०१८-१९ मध्ये १ लाख ३३ हजार ६०० टन इतकी हळद निर्यात झाली होती. २०१९-२० हळदीची निर्यात ४०५० टन वाढून १ लाख ३७ हजार ६५० टनापर्यंत पोहोचली होती. २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. हळूहळू प्रादुर्भाव वाढू लागला. परिणामी, निर्यात काही प्रमाणात बंद होती, त्यामुळे निर्यात घटेल असा अंदाज होता. मात्र याच काळात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात हळदीचा वापर वाढला आहे. २०२०-२१ मध्ये हळदीची १ लाख ८३ हजार ८६८ टन निर्यात झाली. अर्थात, ४६ हजार २१८ टनांनी वाढली.

मसाला पिकांच्या निर्यातीत वाढ

देशात ज्या पद्धतीने हळदीची निर्यात होते, त्याच पद्धतीने तमालपत्री, मिरची, आले, लसूण, वेलची, जिरे यांसह विविध मसाला पिकांची निर्यात केली जात आहे. २०२०-२१ या वर्षात देशातून विविध मसाल्यांची १७ लाख ५८ हजार ९८५ टन इतकी निर्यात करण्यात आली होती. तर २०२१-२२ या वर्षात अंदाजे १५ लाख ३१ हजार १४५ टन निर्यात झाली असून, सुमारे ३० हजार ५७६ कोटी इतके परकीय चलन देशात मिळाले आहे. त्यामुळे देशातून मसाला पिकांची निर्यातदेखील वाढते आहे.

गेल्या चार वर्षांतील हळद निर्यातीवर दृष्टिक्षेप

वर्ष.... निर्यात (टनांत) .... उलाढाल... (लाखांत)

२०१८-१९...१ लाख ३३ हजार ६००...१४१,६१६

२०१९-२०...१ लाख ३७ हजार ६५०...१२८,६९०

२०२०-२१...१ लाख ८३ हजार ८६८...१७२,२६४

२०२१-२२...१ लाख ५३ हजार १५४....१७८,४३३

...

विविध मसाला पिकांची झालेली निर्यात

वर्ष.... निर्यात (टनांत) .... उलाढाल... (लाखांत)

२०१८-१९...११००२५०...१९५०५८१

२०१९-२०...१०२८४००...२२०६२७६

२०२०-२१...१७५८९८५...३०९७३३१

२०२१-२२...१५३११५४....३०५७६४४

(आकडेवारी स्रोत स्पाइसेस बोर्ड)

देशातील हळदीला परदेशात मोठी मागणी आहे. गेल्या तीन वर्षांपासून हळद निर्यातीचा आलेख वाढता दिसून येत आहे. सध्या देशातून १ लाख ५३ हजार १५४ टन हळदीची निर्यात झाली असून, ही निर्यात दोन लाखापर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.
डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन, योजना कसबेडिग्रज, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT