Cotton Market Update
Cotton Market Update Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूस वायद्यांमध्ये वाढ

अनिल जाधव

Cotton Market Update देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर (Cotton Rate) दबावात होते. देशात तर मार्च महिन्यापासून कापूस बाजाराने (Cotton Market) मान टाकली. कापसाचे भाव वाढत नसल्याने शेतकरी कापूस विकत आहेत. पण चालू आठवड्यात वायद्यांमध्ये सुधारणा झाली आहे. अमेरिका, भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये कापूस दरात काहीशी वाढ झाली आहे.

अमेरिकेत चालू आठवड्यात कापूस वायद्यांमध्ये वाढ झाली. कापसाचे वायदे मागील आठवड्यात ८० सेंट प्रतिपाऊंडवर होते. ते या आठवड्यात ८४ सेंटवर पोचले. कापसाच्या वायद्यांमध्ये जवळपास ५ टक्क्यांची वाढ झाली.

तर ‘कॉटलूक ए इंडेक्स’ म्हणजेच जगभरातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचा सरासरी भाव कायम होता. अमेरिकेच्या कापसाला चीनकडून उठाव मिळाल्याने दरात सुधारणा झाल्याचे बाजारातील विश्लेषकांनी सांगितले.

चीनमध्ये चालू आठवड्यात कापसाच्या भावात टनामागे ४४५ युआनची वाढ झाली. आता १५ हजार ६५० युआनचा भाव मिळत आहे.

चीनमध्ये कापडाला उठाव मिळत असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही दिसत आहे. ब्राझीलमध्ये मात्र कापूस दर दबावात राहिले. तर पाकिस्तानमध्ये दर स्थिर होते.

यंदा पाकिस्तानमध्ये कापूस उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे त्याठिकाणी कापसाचे भाव वाढले आहेत. सध्या पाकिस्तानात कापसाला ३७ किलोसाठी २० हजार रुपयांचा भाव आहे.

इतर देशांमध्ये कापसाच्या दरात चालू आठवड्यात वाढ झाली. मागणीमध्ये सुधारणा दिसत असल्याचे अहवाल पुढे आल्यानंतर दरात सुधारणा झाल्याचे बाजारातील विश्लेषकांनी सांगितले.

देशांतर्गत बाजारात कापसाची आवक आजही सरासरीपेक्षा पाच पटीने जास्त होती. बाजारात जवळपास एक लाख गाठी कापसाची आवक झाली होती. गुजरातमध्ये सर्वाधिक ३८ हजार गाठींची आवक झाली. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ३२ हजार गाठींची विक्री केली.

तेलंगणात ९ हजार तर उत्तर भारतात ६ हजार गाठी कापूस बाजारात आला. गेल्या हंगामाचा विचार केला तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापसाची रोजची सरासरी आवक २० हजार गाठींपेक्षाही कमी होती.

काही भागात शेतकऱ्यांकडे कापूस जास्त दिसत असला तरी सर्वच भागात ही परिस्थिती नाही. त्यामुळे बाजारातील कापूस आवक कमी होत जाईल. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील वायदेही सुधारले

भारतातही कापूस वायद्यांमध्ये वाढ झाली. शुक्रवारी (ता. ५) म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ‘एमसीएक्स’वर कापसाचे वायदे १८० रुपयांनी वाढले. वायदे ६३ हजार २६० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये सुधारणा झाल्याचा परिणाम देशातील वायदे बाजारावरही जाणवला. ही सुधारणा पुढील आठवड्यातही कायम राहू शकते.

कापसाच्या दरात सुधारणा

वायद्यांमध्ये कापूस सुधारल्याचा परिणाम काही बाजार समित्यांमध्येही दिसला. अनेक बाजारांमध्ये कापसाच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा दिसली. पण कापसाच्या सरासरी दरपातळीत बदल दिसला नाही.

ती आजही ७ हजार ५०० ते ८ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहे. यामुळे वायद्यांमधील सुधारणेचा परिणाम प्रत्यक्ष बाजारात कमीच दिसला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात २५७ कोटींची ‘एफआरपी’ थकित

Vegetable Production : भाजीपाला उत्पादनाचे गणित बिघडले

Summer Heat : उन्हाच्या तीव्रतेचा फळे, भाजीपाला उत्पादनावर परिणाम

Crop Damage Subsidy : पीकनुकसानीचे ८८ कोटींवर अनुदान ‘अपलोड’

Dungmanure Shortage : बागायतदारांना शेणखताचा तुटवडा

SCROLL FOR NEXT