Tomato Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tomato Market : मागणी वाढल्याने टोमॅटो दरात वाढ

Tomato Rate : आवक ५०० क्‍विंटलवर स्थिर असताना नागपूरच्या कळमना बाजार समितीत टोमॅटोच्या दरात सातत्याने सुधारणा अनुभवली जात आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Pune News : आवक ५०० क्‍विंटलवर स्थिर असताना नागपूरच्या कळमना बाजार समितीत टोमॅटोच्या दरात सातत्याने सुधारणा अनुभवली जात आहे. मागणीत झालेल्या वाढीने ही वाढ होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या टोमॅटोला ३५०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळत आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत टोमॅटो उत्पादन होते. त्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. विदर्भासह राज्याच्या इतर भागातूनही टोमॅटो आवक होते. त्यासह नागपूरलगतच्या मध्यप्रदेशातील छिंदवाडा परिसरातून इतर पालेभाज्यांसोबत टोमॅटो देखील बाजारात येतो. त्यामुळे सद्यःस्थितीत आवक सरासरी ५०० क्‍विंटलच्या घरात आहे.

सोमवारी (ता. १) संकरित टोमॅटोचे दर ३००० ते ५५०० रुपयांवर होते. त्याचवेळी स्थानिक टोमॅटोचे व्यवहार ३००० ते ५००० रुपयांनी होत होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत बुधवारी (ता.३) स्थानिक टोमॅटो वाणाचे दर उच्चांकी ४००० ते १० हजार रुपयांवर पोहचले. या वेळी आवक ही ४०० क्‍विंटलच्या घरात होती.

टोमॅटोचा सरासरी दर ८५०० रुपये राहिला. त्यानंतरच्या काळात हायब्रीड टोमॅटोला ३५०० ते ५५०० तसेच ४००० ते ६००० रुपयांचाही दर मिळाला. याची आवक ५०० क्‍विंटल अशी स्थिर होती. आता मात्र स्थानिक आणि संकरित या दोन्ही वाणाच्या टोमॅटोला ३५०० ते ७००० रुपयांचा दर मिळत आहे. याचे सरासरी दर ६३७५ रुपये राहिले.

पावसामुळे दर वाढले

विदर्भासह राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. या काळात पालेभाज्यांचे नुकसान होते. त्यामुळे काही पालेभाज्यांच्या दरात सुधारणा अनुभवली जात आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. यापुढील काळात टोमॅटो दर आणखी वाढतील, अशीही शक्‍यता त्यांनी वर्तविली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT