Tomato Rate : मागणीमुळे टोमॅटो दरातील वाढ टिकून

Tomato Market : उन्हाळी टोमॅटो लागवडीत तापमानाचा मोठा फटका बसला. शिवाय फूलगळ झाल्याने उत्पादकता घटली आहे.
Tomato Rate
Tomato RateAgrowon
Published on
Updated on

Nashik News : : उन्हाळी टोमॅटो लागवडीत तापमानाचा मोठा फटका बसला. शिवाय फूलगळ झाल्याने उत्पादकता घटली आहे. याशिवाय मिळणाऱ्या कमी उत्पादनासोबत प्रतवारीचा दर्जा कमी असल्याने गुणवत्तेनुसार दर आहेत. सध्या मागणी टिकून असल्याने किलोला सरासरी ३० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. टोमॅटो पुरवठा मर्यादित नसल्याने दरातील वाढ टिकून आहे.

चालूवर्षी उन्हाळी टोमॅटो लागवड हंगामात तापमान अधिक असल्याने झाडांची वाढ होऊ शकली नाही. वाढीच्या अवस्थेत झालेली फूलगळ व अपेक्षित फळधारणा न झाल्याने उत्पादन मर्यादित आहे. त्यामुळे राज्यभरात आवक तुलनेने कमी असल्याचे नारायणगाव, संगमनेर, नाशिक व पिंपळगाव बसवंत या बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

Tomato Rate
Tomato Varieties : खरीप हंगामासाठी टोमॅटोचे सुधारित वाण

मागील वर्षाच्या तुलनेत ही आवक कमी असल्याने सध्या स्थानिक बाजारातच मालाची विक्री होत आहे. तर मागणीनुसार किरकोळ प्रमाणात मुंबईसह गुजरातमधील वापी, सुरत, अहमदाबाद, बडोदा अशा बाजारपेठेत व्यापारी माल पाठवीत आहेत.

पुरवठ्यासाठी टोमॅटो अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने काही व्यापारी दक्षिण भारतात खरेदी करून गुजरात व मुंबईकडे पुरवठा करत आहेत. स्थानिक बाजारात उपलब्धता कमी असल्याने किरकोळ विक्री ७० ते १०० रुपये किलो दरम्यान होत आहे.

Tomato Rate
Tomato Farming : शेतकरी वळताहेत टोमॅटो पिकाकडे

दक्षिण भारतात टोमॅटोची उपलब्धता

आंध्रप्रदेश...मदनपल्ले,चित्तूर,चिंतामणी

कर्नाटक...कोलार, बंगलोर

तमिळनाडू...धर्मपुरी, सेलम,

तेलंगणा...रंगारेड्डी,संघारेड्डी,सिद्धीपेठ

राज्यातील प्रमुख बाजारातील दरस्थिती:

बाजार समिती...आवक...किमान...कमाल...सरासरी

नारायणगाव...२१६८...२५००...६०००...४०००

संगमनेर...१०८०...१०००...४५००...२७५०

नाशिक...९८९...५००...५७५०...३०००

पुणे...२११२...२०००...५५००...३७५०

मुंबई...१७३३...५०००...५५००...५२००

(स्त्रोत: महाराष्ट्र राज्य कृषी पणान मंडळ)

उन्हाळ्यात १५ मे नंतर टॉमेटो लागवडीमध्ये झाडांची वाढ होण्यात अडचणी आल्या. त्यामध्ये उष्णता व कमी आर्द्रता हा परिणामकारक घटक राहिला. अपेक्षित फुलकळी लागली नाही. त्यामुळे फळ धारणा उत्पादकता कमी करणारी ठरली. परिणामी उत्पादन कमी असल्याने आवक मर्यादित आहे. मान्सूनपूर्व पाऊस कमी आल्याने नवीन लागवडी सध्या तुलनेने कमी आहेत. त्यामुळे दरातील वाढ टिकून राहण्याची शक्यता आहे.
- प्रा. तुषार उगले, सहाय्यक प्राध्यापक, के. के. कृषी महाविद्यालय
आवक कमी असल्याने स्थानिक पातळीवरील मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळे स्थानिक बाजारात खरेदीसह दक्षिण भारतातून मालाची खरेदी सुरू आहे. मागणीनुसार गुजरातमधील कच्छ, भोज या परिसरात तो माल पाठवीत आहोत. मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने ४० रुपयांपासून ६० रुपयांपर्यंत प्रतवारीनुसार सध्या घाऊक बाजारात दर आहेत.
- राजेश म्हैसधुणे, टोमॅटो व्यापारी, नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com