Soybean Cotton Rate
Soybean Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Cotton Rate : सोयाबीन, कापूस, मक्याच्या भावात वाढ

डॉ.अरूण कुलकर्णी

दिवाळीमुळे मागील सप्ताहात आवक कमी झाली होती. ४ नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात मात्र खरीप पिकांची आवक (Kharif Crop Arrival) वाढलेली आहे. विशेषतः कापूस (Cotton), मका (Maize), सोयाबीन (Soybean) व कांदा यांची आवक (Onion Arrival) गेल्या सप्ताहाच्या तुलनेने अनुक्रमे ३.३, ३.२, ४.७ व २.१ पटीने वाढलेली आहे. परंतु मागणी टिकून असल्याने वाढत्या आवकेचा परिणाम कांद्याखेरीज इतर पिकांवर जाणवला नाही. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ४ टक्क्यांनी, मक्याचे १.६ टक्क्याने व सोयाबीनचे (Soybean Rate) ३.४ टक्क्यांनी वाढले. कांद्याचे मात्र घसरले.

३१ ऑक्टोबर रोजी शासनाने रब्बी पिकांसाठी हमीभाव जाहीर केले. हरभऱ्याचे हमीभाव प्रति क्विंटल रु. ५,३३५ असतील. गेल्या वर्षी ते रु. ५,२३० होते.

सध्या NCDEX मध्ये मक्याचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च डिलिव्हरीचे व्यवहार उपब्ध आहेत. हळदीचे नोव्हेंबर, डिसेंबर, एप्रिल व मे डिलिव्हरीचे व्यवहार, तर MCX कापसाचे नोव्हेंबर व डिसेंबरसाठीच व्यवहार करता येतील.

या सप्ताहातीमधील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) ऑक्टोबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ०.२ टक्क्याने घसरून रु. ३१,३६० वर आले होते; या सप्ताहात मात्र ते ४ टक्क्यांनी वाढून रु. ३२,६३० वर आले आहेत. डिसेंबर डिलिव्हरी भाव रु. ३१,८३० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ४ टक्क्यांनी वाढून रु १,८०१ वर आले आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती १.६ टक्क्याने वाढून रु. २,१७१ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (डिसेंबर डिलिवरी) किमती रु. २,२४९ वर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स किमती रु. २,२४९ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्याने वाढून रु. ७,४०४ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती २.६ टक्क्यांनी वाढून रु. ७,६०२ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ८,१९८ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात ०.२ टक्क्याने वाढून रु. ४,६५८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्याने घसरून रु. ४,६४३ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

मूग

मुगाच्या किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,२०० वर स्थिर आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) गेल्या सप्ताहात ४.८ टक्क्यांनी वाढून रु. ५,५५६ वर आली होती; या सप्ताहात ती पुन्हा ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ५,७४४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात ३.८ टक्क्यांनी वाढून रु. ७,६१२ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. २,५६० होती; या सप्ताहात ती रु. २,२२५ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,००० होती. या सप्ताहात ती रु. १,००० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT