Turmeric Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market : हळद वगळता सर्व पिकांच्या भावात वाढ

Turmeric Market : गेल्या महिन्यात हळद, मूग व तूर यांचे भाव वाढले. तुरीच्या भावाने आता रु. १०,००० चा पल्ला ओलांडला आहे.

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह ३० मार्च ते ५ एप्रिल २०२४

गेल्या महिन्यात हळद, मूग व तूर यांचे भाव वाढले. तुरीच्या भावाने आता रु. १०,००० चा पल्ला ओलांडला आहे. कापसाचे भाव फेब्रुवारीअखेर वाढत होते; ते मार्चमध्ये रु. ६०,००० ते रु. ६२,००० च्या दरम्यान राहिले. हरभऱ्याचे भाव घसरले. सोयाबीनचे भाव रु. ४,५०० ते रु. ४,७०० च्या दरम्यान राहिले.

हळदीच्या तेजीमुळे फ्यूचर्स मार्केटमधील व्यवहारसुद्धा वाढले. बाजार समितीतील हळद, हरभरा यांची आवक वाढत होती. तुरीची व कापसाची आवक घसरू लागली आहे. कांद्याची व टोमॅटोची आवक स्थिर होती. या सप्ताहात हळद वगळता सर्वच पिकांचे भाव वाढले. टोमॅटोमधील चढ-उतार लक्षणीय आहेत.

५ एप्रिल २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालीलप्रमाणे आहेत ः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ६०,४२० वर आले होते. या सप्ताहात ते ०.३ टक्क्याने वाढून रु. ६०,५८० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव ०.७ टक्क्याने घसरून रु. ६१,५८० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव रु. ६२,७०० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.५ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाची आवक कमी होत आहे.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात १.१ टक्क्याने वाढून रु. १,५१० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात ४.५ टक्क्यांनी वाढून रु. २,३०० वर आले आहेत. फ्यूचर्स (मे) किमती ४.४ टक्क्यांनी वाढून रु. २,३२२ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. २,३५० वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.२ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. मक्याची आवक कमी होत आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १६,५५९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने घसरून रु. १६,५७७ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती १.२ टक्क्याने घसरून रु. १७,३९८ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १७,९८० वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ८.५ टक्क्यांनी जास्त आहेत. हळदीची आवक वाढत आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात रु. ५,५०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी वाढून रु. ५,७०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० जाहीर झाला आहे. हरभऱ्याची आवक वाढत आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) १.१ टक्क्याने वाढून रु. ९,४०० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ जाहीर झाला आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) २.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,६७१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ९,७७५ वर आली होती. या सप्ताहात ती २.४ टक्क्यांनी वाढून रु. १०,००५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे; मागणीमुळे नोव्हेंबरपासून भाव वाढत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,४६६ होती; या सप्ताहात ती रु. १,३७९ वर आली आहे. गेल्या तीन महिन्यांत कांद्याची आवक स्थिर आहे; किमती मात्र ८ मार्चपासून घसरत आहेत. रब्बीची आवक पुढील महिन्यात सुरू होईल.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,००० वर आली होती. या सप्ताहात ती रु. ७५० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT