Vegetable Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Vegetable Market : ऐन उत्‍सवात भाज्‍यांची दरवाढ

Vegetable Rate : भाज्यांचे भाव किलोमागे ३० ते ५० रुपयांनी वाढले आहेत. कोथिंबीर जुडी १०० रुपयांना विकली जात आहे.

Team Agrowon

Vegetable Market Update : गणेशोत्‍सवात बहुतांश भाविक शाकाहाराला प्राधान्य देत असल्‍याने भाज्यांची मागणी वाढली आहे. सध्या आवक कमी असल्‍याने स्‍थानिक भाज्‍यांनाही पसंती मिळत आहे. भाज्यांचे भाव किलोमागे ३० ते ५० रुपयांनी वाढले आहेत. कोथिंबीर जुडी १०० रुपयांना विकली जात आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाण्यातून आलेले चाकरमानी स्थानिक भाज्‍यांची खरेदी करताना दिसतात. आदिवासी बांधव डोंगर-दऱ्यांत रानभाज्‍यांची शेती करतात. यातून त्‍यांना चांगला मोबदलाही मिळतो.

भाज्यांचे भाव गत महिन्याच्या तुलनेत ३० ते ५० रुपयांनी वाढले असले तरी ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्‍याचे विक्रेत्‍या महिला सांगतात. सध्या सकाळी पेण येथील कृषी उत्पन्न समितीच्या बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड होत आहे.

बाजारात वांगी ६० रुपये किलो, भेंडी ६०, टोमॅटो ५०, मटार २५०, मिरची ६०, गवार ६०, फरसबी ६०, फ्लॉवर ८० आदी भावाने सध्या विक्री होत आहे.

कोथिंबिरीची जुडी १०० रुपयांना असल्‍याने अनेकांच्या जेवणातून गायब झाली. पेण परिसरात भेंडी, शिराळे, कारली, काकडी व पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

गणेशोत्सवात शाकाहारी जेवणाला भाविकांकडून पसंती असते. गणेश दर्शनासाठी दिवसभर पाहुणे येत असल्‍याने जेवणात भाज्यांचा वापर होत असल्याने चढ्या भावात भाज्‍या खरेदी कराव्या लागतात.
- मोहिनी पाटील, गृहिणी
घाऊक बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. वाहतुकीचा खर्च वाढल्याने काही भाज्यांचे दर थोड्याफार प्रमाणात वाढले असले तरी मुबलक प्रमाणात भाजी बाजारात विक्रीसाठी आहे.
- नीलेश पाटील, विक्रेता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bihar Election Exit Polls 2025: 'एनडीए'ला बहुमत?, 'महागठबंधन'ला किती जागा?, 'PK'ची जादू चालली नाही, एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात?

PM Kisan Update: कधी मिळणार पीएम किसानचा २१वा हप्ता...

Citrus Farming: संत्रा काढणीतील काळजी म्हणजे गुणवत्तेची खात्री

Kharif Prices Crash: स्वतःच्या राज्यात भाव नाही; शेजारील राज्यात जाऊन शेतमाल विक्री, मग अटक अन् माल जप्त...

Agriculture Department Logo: कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण  

SCROLL FOR NEXT