Wild Vegetables : कोल्हापुरात रानभाज्यांचा खजिना, जोतिबा डोंगरावर ४७ हून अधिक औषधी रानभाज्या आढळल्या

Jotiba Hill : कोल्हपूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगर भागात रानभाज्या मोठ्या प्रमाणात उगवल्याने स्थानिक लोक रानभाज्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत.
Wild Vegetables
Wild VegetablesAgrowon
Published on
Updated on

Wild Vegetables Kolhapur : श्रावण महिन्यापासून डोंगराळ भागात रानभाज्या उगवायला सुरूवात होते. रानभाज्यांचा सर्वाधिक वापर गौरी गणपतीला नैवेद्य म्हणून वापर केला जातो. आगाडा हा गणपतीला दिला जातो तर शेपूसह इतर भाज्यांचा वापर गौरी दिवशी केला जातो. कोल्हपूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगर भागात रानभाज्या मोठ्या प्रमाणात उगवल्याने स्थानिक लोक रानभाज्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत.

जोतिबा डोंगर, गिरोली, पोहाळे परिसरात आढळणाऱ्या ४७ हून अधिक रानभाज्या गावोगावीच्या महिला बचत गटांनी शोधून आणून विक्रीसाठी उपलब्ध केल्यास रोजगाराचे नवे साधन उपलब्ध होणार आहे. यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. जून-जुलै महिन्यात दरवर्षी डोंगर पठारावर जंगलात तसेच शिवारात नैसर्गिक पद्धतीने रानभाज्या उगवतात. या रानभाज्या रोगप्रतिकारकशक्ती वाढवितात. पूर्वजांना या रानभाज्यांची सखोल माहिती होती.

पण, अलीकडच्या काळातील पिढीला मात्र या रानभाज्यांची माहिती नाही. गेल्या काही वर्षांपासून या रानभाज्यांची ओळख कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने करून दिली आहे. निसर्ग मित्र परिवार संस्थेने कोल्हापूर, गडहिंग्लज, पोहाळे, बाजार भोगाव येथील महिलांना या रानभाज्यांची ओळख तसेच त्या कशाप्रकारे शिजवायच्या याची माहिती दिली आहे.

Wild Vegetables
Kolhapur Onion Market : काद्यांची आवक वाढली दरावर किंचीत परिणाम, कोल्हापूर बाजारपेठेत अशी आहे स्थिती

जोतिबा डोंगर, पोहाळे, कुशिरे, गिरोली, दाणेवाडी (ता. पन्हाळा) या भागातील डोंगर पठार व शिवारामध्ये ४७ हून अधिक प्रकारच्या रानभाज्या सापडतात. कित्येक वर्षांपासून या रानभाज्यांकडे दुर्लक्ष होते. सध्या त्याचा वापर होत आहे. आता त्यातून रोजगाराच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

या भागामध्ये भारंगी, मोरशेंड, गुळवेल, टाकाळा, पाथरी, तेरडा, केना, घोळी, अंबुशी, आघाडा, हादगा, कुर्डू, काटेमाठ, रानमोहर, फांजिरा, या प्रकारच्या ४७ हून अधिक रानभाज्या आढळतात. पर्यटक व जोतिबा डोंगरावर येणारे भाविक रविवारी सुट्टीदिवशी डोंगर पठाराला भेट देऊन रानभाज्या घेऊन जातात.

निसर्गमित्र अनिल चौगुले म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील डोंगर पठारावर रानभाज्यांचा मोठा खजिना आहे. या सर्व रानभाज्या औषधी गुणधर्माच्या आहेत. त्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. या रानभाज्यांची माहिती महिलांना व्हावी यासाठी निसर्गमित्र परिवारतर्फे अगदी रानभाज्या शोधण्यापासून त्याची भाजी कशी करायची हे सर्व शिकविले आहे. गणेशोत्सव काळात या रानभाज्यांचा वापर प्रसादात करायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com