Ghevda Vegetable
Ghevda VegetableAgrowon

Ghevda Vegetable : सातारा जिल्ह्यात पावसामुळे घेवडा उत्पादनात घट

Beans Crop : पावसामुळे घटलेले उत्पादन, पडलेला दर, भिजलेला घेवडा खरेदीबाबत व्यापाऱ्यांची अनुत्सुकता आदी अनेक कारणांमुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उद्‌भवले आहे.
Published on

Satara News : पावसामुळे घटलेले उत्पादन, पडलेला दर, भिजलेला घेवडा खरेदीबाबत व्यापाऱ्यांची अनुत्सुकता आदी अनेक कारणांमुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उद्‌भवले आहे.

कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा घेवड्याचे आगार म्हणून ओळखले जाते. या पिकाला साधारण कोरडे हवामान मानवते. अति पाऊस व जास्त तापमान त्यास सहन होत नाही. आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड आदी भागांत घेवड्याला जमीन आणि हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी त्याचे उत्पादन घेतात.

Ghevda Vegetable
Vegetable Market : सांगलीत वांग्याला प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर

पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन भागात मे-जूनमध्ये त्याची लागवड होते. लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी उत्पादन सुरू होते. ओल्या शेंगांचे सुमारे पाच ते सहा तोडे होतात. एकूण एकरी ३५ ते ४० क्विंटल उत्पादन मिळते.

Ghevda Vegetable
Vegetable Farming : बारमाही भाजीपाला लागवडीवर भर

परिसरातील पिंपोडे बु्द्रुक, सोनके, नांदवळ, करंजखोप, वाघोली परिसरांत खरीप हंगामात घेवडा पिकाचे उच्चांकी उत्पादन घेतले जाते. घेवडा पिकातून मिळणाऱ्या आर्थिक मिळकतीवरच या परिसरातील शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत असते; परंतु या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे घेवड्याचे उत्पादन घटले आहेच.

याशिवाय काढणी काळात पावसाचा दीर्घकाळीन मुक्काम राहिल्याने घेवड्याचे अतोनात नुकसान झाले असून, पावसात भिजलेला घेवडा लाल पडला असल्या कारणाने व्यापाऱ्यांनी घेवडा खरेदीबाबत अनुत्सुकता दाखवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com