Potato Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Potato Market : ओल्या बटाट्याच्या आवकेमुळे सुक्या बटाट्याच्या दरांत वाढ

Potato Rate : यावर्षी आग्रा येथील बटाट्याच्या काढणी हंगामामध्ये पाऊस झाला होता. यामुळे बटाटा भिजल्याने त्याच परिस्थितीत ओले बटाटे शितगृहात ठेवण्यात आले.

Team Agrowon

Pune News : पुणे बाजार समितीमधील बटाट्याची बाजारपेठ आग्रा आणि इंदूर येथील बटाट्यावर अवलंबून असून, सध्या आग्रा येथील शितगृहातील ओल्या बटाट्याची आवक सुरू असून, वाहतुकीमध्ये बटाटा खराब होत असल्याने इंदूरच्या चांगल्या आणि सुक्या बटाट्याच्या दरांत प्रतिकिलो ५ रुपये तर क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ आणखी होण्याची शक्यता बाजार समितीमधील बटाट्याचे प्रमुख आडतदार आणि बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र कोरपे यांनी व्यक्त केली.

याबाबत कोरपे म्हणाले, की यावर्षी आग्रा येथील बटाट्याच्या काढणी हंगामामध्ये पाऊस झाला होता. यामुळे बटाटा भिजल्याने त्याच परिस्थितीत ओले बटाटे शितगृहात ठेवण्यात आले. शितगृहात बटाटे ठेवल्याने काही परिणाम झाला नाही. मात्र दोन ते चार महिन्यांनी बटाटे शितगृहातून बाहेर काढल्यानंतर त्याचा वातावरणातील तापमामानाशी संबंध आला आणि त्याला आर्द्रता निर्माण झाल्याने बटाट्याला पाणी सुटले.

त्यात वाहतुकीमध्ये बटाट्याच्या गोणी एकमेकांवर राहिल्याने बटाटा गरम होऊन खराब होण्याचे प्रमाण वाढले. यामुळे बटाट्याचा दर्जा खालावला. यामध्ये २० टक्क्कयांपर्यंत बटाटा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी आग्रा बटाट्याची मागणी कमी होऊन, इंदूरच्या चांगल्या कोरड्या बटाट्याला मागणी वाढल्याने दर वाढले आहेत.

सध्या बाजार समितीमध्ये आग्रा येथून २५ ते ३० ट्रक (७०० ते ७५० टन) बटाट्याची आवक होत आहे. तर इंदूरच्या बटाट्याची सुमारे १५ टेम्पो (२०० टन) आवक होत आहे. या वेळी आग्रा बटाट्याला २५ ते ३० तर इंदूरच्या बटाट्याला ३० ते ३५ रुपये दर मिळत आहे. हे दर सर्वसाधारण ५ ते १० रुपयांनी अधिक असल्याचे कोरपे यांनी सांगितले.

स्थानिक लागवडी खोळंबल्या

पुणे बाजार समितीत स्थानिक बटाट्याचा हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. जिल्ह्यामध्ये मंचर, खेड, आंबेगाव, सातगाव पठारसह सातारा जिल्ह्यातील वाठार परिसरात बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. या परिसरातील लागवडी पावसाअभावी खोळंबल्या असून, स्थानिक बटाट्याचा हंगाम सुरू झाल्यावर दर आवाक्यात येतील, असा अंदाज कोरपे यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT