Potato Market : लग्नसराई, उन्हाळ्यामुळे बटाटे मागणीत वाढ

Potato Rate : नगर येथील बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून बटाट्याची मागणी वाढली आहे. उन्हाळा, लग्नसराई यामुळे मागणी असल्याने चांगला दर मिळत आहे.
Potato
PotatoAgrowon

Nagar News : नगर येथील बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून बटाट्याची मागणी वाढली आहे. उन्हाळा, लग्नसराई यामुळे मागणी असल्याने चांगला दर मिळत आहे. मागील सात दिवसांपासून बटाट्याला २७०० रुपयांचा प्रतिक्विंटलला भाव आहे.

नगर जिल्ह्यात उन्हाळ्यात बटाट्याला मागणी असते. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू झालेली आहे. त्यामुळे लग्नसराईत जेवणामध्ये अनेक ठिकाणी बटाट्याच्या भाजीला प्राधान्यक्रम दिला जात आहे. त्यात आता लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने बटाट्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे बटाट्याला आता चांगला भाव मिळत आहे.

Potato
Potato Crop : बटाटा पिकाबरोबर इतर पिकेही घेण्यावर भर द्यावा

उन्हाळ्याचे दिवस सध्या सुरू आहेत. अनेक घरांमध्ये कुरड्या, शेवया व वेफर्ससह बटाट्याचा किस बनविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या शहरासह ग्रामीण भागातून बटाट्याला मागणी वाढलेली आहे. त्यामुळे भावात वाढ झालेली आहे. सध्या किमान ५०० व कमाल २७०० रुपये प्रतिक्विंटल दराने बटाट्याची विक्री होत आहे.

गेल्या सात दिवसांत सरासरी दर १५०० ते १६५० दरम्यान मिळाला आहे. ३५० ते ४८१ क्विंटल दरम्यान बटाट्याची आवक होत आहे. मात्र, मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. ही वाढ मे महिन्यातही कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

Potato
Potato Production : बटाटा उत्पादनात यंदा चाळीस टक्क्यांची घट

स्पेशल चिप्ससाठी ‘व्हाइट इंदोर’ला मागणी

सध्या स्थानिक पातळीवरील बटाट्याची आवक जवळपास संपलेली आहे. त्यामुळे बाहेरील राज्यातून बटाट्याची आवक होत आहे. आग्रा, गुजरात, इंदोर, खांडवा, पश्‍चिम बंगाल आदी ठिकाणांवरून बटाट्याची आवक होत आहे. स्पेशल चिप्ससाठी व्हाइट इंदोर बटाट्याला अधिक मागणी आहे.

आठवडाभरातील बटाटे दर स्थिती

दिनांक ः दर (प्रतिक्विंटल)

२० ः ५०० ते २७००

१९ ः ६०० ते २७००

१८ ः ५०० ते २७००

१६ ः ६०० ते २७००

१५ ः ५०० ते २५००

१४ ः ६०० ते २७००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com