Potato Production : बटाटा उत्पादनात यंदा चाळीस टक्क्यांची घट

Potato Market : बटाटा उत्पादनात पस्तीस ते चाळीस टक्क्यांची घट झाली असल्याचे बटाटा उत्पादक शेतकरी सांगत आहे.
Potato Production
Potato ProductionAgrowon

Nagar News : अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा मोठा फटका यंदा बटाटा उत्पादनाला बसला आहे. बटाटा उत्पादनात पस्तीस ते चाळीस टक्क्यांची घट झाली असल्याचे बटाटा उत्पादक शेतकरी सांगत आहे. बटाट्याला मात्र दरवर्षीच्या तुलनेत बाजारात काहीसा चांगला दर असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगलीसह मराठवाड्यातील अनेक भागांत बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. दुष्काळी आणि अल्प पाण्याचे प्रमाण असलेल्या भागात बटाटा उत्पादनाला शेतकरी प्राधान्य देतात. साधारण ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये लागवड करून फेब्रुवारी, मार्च महिन्यांत काढणी होते.

Potato Production
Potato Storage : काढणीनंतर बटाट्याची साठवण करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा

नगर जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा असलेल्या भालगाव (ता. पाथर्डी), राहाता, कोपरगाव भागात बटाटा उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. अनेक भागांत बटाट्याचे ऊस व अन्य पिकांतही आंतरपीक घेतले जात आहे. दुष्काळी भागतील अनेक ठिकाणी बटाट्याच्या पिकांवर अर्थकारण अवलंबून आहे.

Potato Production
Potato Crop : बटाटा पिकाबरोबर इतर पिकेही घेण्यावर भर द्यावा

यंदा सुरुवातीपासूनच पुरेसा पाऊस नव्हता, परतीचा पाऊसही झाला नाही. त्यामुळे बटाट्याची लागवड झाली, परंतु शेवटच्या टप्प्यात पाणी मिळाले नसल्याने बटाटा पोसण्याला अडसर आल्याने उत्पादन कमी झाले आहे. यंदा साधारण तीस ते चाळीस टक्के फटका बसला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

बाजारात दर चांगला

उन्हाळ्यातील मागणीचा विचार करता फेब्रुवारी, मार्च महिन्यांत तुलनेने बटाट्याचे अधिक उत्पादन घेतले जाते. सध्या बाजारात दररोज प्रत्येक बाजार समितीत दोनशेपासून एक हजार क्विटंलपर्यंत आवक होत आहे. बाजारात प्रति क्विंटलला सहाशेपासून दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर बरा असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

आमच्या भागात बटाट्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा उपलब्ध पाण्याचे नियोजन करून उत्पादन घेतले. मात्र पाणीटंचाईचा उत्पादनाला तीस ते चाळीस टक्के फटका बसला आहे. मी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केले.
- गोरक्षनाथ खेडकर, बटाटा उत्पादक शेतकरी, भालगाव, ता. पाथर्डी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com