Mango Season Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Season : विदर्भात आंबा आवकेत वाढ

Mango Market : बाजारात गेल्या काही दिवसांपासून आंध्रप्रदेश, तेलंगणा तसेच स्थानिक आंब्याची आवक मंदावली होती. त्यानंतर आता पुन्हा आंबा आवक वाढली आहे.

Team Agrowon

Amravati News : बाजारात गेल्या काही दिवसांपासून आंध्रप्रदेश, तेलंगणा तसेच स्थानिक आंब्याची आवक मंदावली होती. त्यानंतर आता पुन्हा आंबा आवक वाढली आहे. सध्या बाजारात कैरीसह दशेहरी, बैगणपल्ली व इतर जातींच्या आंब्यांची आवक होत आहे. सध्या अवकाळी पाऊस सातत्याने बरसत असल्याने मागणी काहाशी घटल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगितले जाते.

विदर्भातील अमरावतीसह, भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यात देखील आंबा बागांचे अस्तित्व कायम आहे. याच भागातून कैरीची आवक होते. सद्यःस्थितीत गावरान कैरीला ३००० ते ४००० रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे.

आवक ११० क्‍विंटलची आहे. किरकोळ बाजारात ५५ ते ६० रुपये किलो दराने कैरी विकल्या जात आहे. इतर राज्यातील दशेहरी, बैगणपल्ली आंबा आवक देखील होत आहे. दशेहरी आंब्याला देखील ३००० ते ४००० रुपयांचा दर आहे. याची आवक सरासरी १४० क्‍विंटल आहे.

बैगणपल्ली आंब्याची आवक सर्वाधिक ३०० क्‍विंटलची आहे. याला दर देखील उच्चांकी ४५०० ते ५००० रुपये दर आहे. यापूर्वी बैगणपल्ली आंब्याचे दर ३५०० ते ४००० रुपयांवर होते. त्यात नजीकच्या काळात वाढ झाली आहे. सध्या बाजारात आंबा आवक वाढत असली तरी तुलनेत मागणी कमी असल्याचे सांगितले जाते.

गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस जिल्ह्यात कोसळत आहे. त्याचाही परिणाम मागणीवर झाला आहे. नागपूरच्या कळमना बाजारात कैरीला १५०० ते २००० रुपयांचा दर मिळत आहे. आवक २०० क्‍विंटल आहे. सुरवातीला ही आवक ८० क्‍विंटलपेक्षा कमी होती. मागणी अधिक असताना कैरीचे दर ३००० ते ३५०० रुपयांवर पोचले होते. आता मात्र पावसाळी वातावरणामुळे मागणीत झालेल्या घटीच्या परिणामी दर दबावात आले आहेत.

लिंबू दर दबावात

गेल्या काही दिवसांपासून लिंबू फळांची मागणी वाढली होती. त्यामुळेच लिंबू दरानी दहा हजारांचा पल्ला गाठला होता. नागपूरच्या कळमना तसेच अमरावती फळे व भाजीपाला बाजारात लिंबाचे दर तेजीत होते.

आता मात्र वातावरणातील बदलामुळे लिंबाची मागणी देखील घटली आहे. परिणामी दर दबावात आले आहेत. लिंबाला ४००० ते ६००० रुपये दर आहे. दरात ३५०० ते ४००० रुपयांची घट झाली आहे. तापमानात वाढ झाल्यास यात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT