Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : बेदाण्याच्या मागणीत सणासुदीमुळे वाढ

Bedana Rate : रक्षाबंधन, गणपती आणि जन्माष्टमी या सणानिमित्त देशभरातील व्यापाऱ्यांकडून बेदाणा खरेदीची लगबग सुरु झाली आहे.

अभिजीत डाके

Sangli News : रक्षाबंधन, गणपती आणि जन्माष्टमी या सणानिमित्त देशभरातील व्यापाऱ्यांकडून बेदाणा खरेदीची लगबग सुरु झाली आहे. प्रत्येक सौद्याला १० हजार टन बेदाण्याची विक्री होत आहे. सणानिमित्त मागणीही वाढली असून उठावही होत आहे. दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. त्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिन्यापासून सणांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील व्यापाऱ्यांकडून बेदाणा खरेदी सुरु झाली आहे. सांगली, तासगाव या दोन प्रमुख बेदाण्याच्या बाजारपेठांसह अन्य बाजारपेठेत दररोजच्या सौद्यात सुमारे १० हजार टन बेदाणा विक्रीस येत आहे. तेवढाच बेदाणा खरेदी केला जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सणासुदीनिमित्त अपेक्षित दर मिळतात. त्यानुसार शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे.

पोषण आहारातील समावेश कधी?

शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्याबाबत अद्यापही स्पष्ट निर्णय झालेला नाही. त्याचे निकष कसे असणार आहेत. याबाबत निर्णय कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश केल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल. बेदाण्याला भौगोलिक मानांकन मिळाले असल्याने त्याचे ब्रॅंडिंग आणि विक्री करणे सोपे होईल, असे उत्पादकांनी सांगितले.

बेदाणा दर स्थिती (प्रति किलो)

पिवळा - ९० ते १५०

हिरवा - ७० ते २१०

बेदाण्याचे दर टिकून आहेत. सणानिमित्त बेदाण्याची मागणी वाढत आहे. येत्या काळात दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली.
बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश केला आहे. त्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी बेदाण्याला भौगोलिक मानांकनही मिळाले आहे. त्यामुळे बेदाण्याचे ब्रॅंडिंग आणि विक्री करणे सोपे होईल.
- संजय बरगाले, विभागीय अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Market: खानदेशातील पशुधन बाजारांत गजबज

Akola Heatwave: अकोल्यात उन्हाचा पारा वाढल्याने घामाच्या धारा

Water Shortage: फुलवडे येथील पाझर तलावाने गाठला तळ

Banana Farming Crisis: पार्डी शिवारात केळीची तीन हजार झाडे कापली

Women Farmer Story: महिला पशुपालकांनी शोधलाय इंधन स्वयंपूर्णतेचा मार्ग

SCROLL FOR NEXT