Dragon Fruit Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूटच्या मागणीत वाढ

Market Update : यंदाच्या हंगामातील चौथ्या बहरातील ड्रॅगन फ्रूटची विक्री दहा ते बारा दिवसांत सुरू होईल. ड्रॅगन फ्रूटला पोषक वातावरण असल्याने फळांची चांगली वाढ झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : यंदाच्या हंगामातील चौथ्या बहरातील ड्रॅगन फ्रूटची विक्री दहा ते बारा दिवसांत सुरू होईल. ड्रॅगन फ्रूटला पोषक वातावरण असल्याने फळांची चांगली वाढ झाली आहे. बाजारपेठेत या फळाला मागणी वाढल्याने गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून आहेत. सध्या ड्रॅगन फ्रूटला प्रति किलो ८० ते १५० रुपये असे दर मिळत आहेत. सध्या पोषक वातावरण असल्याने चौथ्या बहरातील ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनात वाढ होईल, अशी शक्यता उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ड्रॅगन फ्रूटला पोषक वातावरण मिळाले नाही. त्यातच अतिपावसामुळे फुलकळी निघण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. याचा फटका ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनावर बसला आहे. हंगामाच्या प्रारंभापासूनच या फळांना चांगले दर असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या हंगामातील ड्रॅगन फ्रूटचे तीन बहर पूर्ण झाले आहेत. आजअखेर अंदाजे अडीच हजार टनांची विक्री झाली आहे. चौथ्या बहरातील ड्रॅगन फ्रूटची विक्री येत्या दहा ते बारा सुरू होईल. गेल्या पंधरा दिवसांपासून पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे फुलकळीसुद्धा चांगली निघाली असून, अपेक्षित फळांचा आकार मिळाला आहे. पोषक वातावरणामुळे चौथ्या भागातील उत्पादनात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दर टिकून राहील

गेल्या महिन्याभरापासून बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटला ८० रुपयांपासून ते १५० रुपये प्रति किलो असे दर आहे. ड्रॅगन फ्रूटची बाजारपेठेत मागणी वाढली असून उठावही होत आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून आहेत. येत्या काळात ही दर स्थिर राहतील.

शेतकरी ड्रॅगन फ्रूटची पुढील वर्षी निर्यात करण्यासाठी आतापासूनच नियोजन करू लागले आहेत. काही शेतकऱ्यांकडून निर्यातही केली जात आहे.
महेश आसबेस, उत्पादक शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT