Market Update Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : कापसाच्या भावात काहीशी वाढ; कापूस, सोयाबीन, आले काय आहेत दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, गहू, मका आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन काहीसे सुधारले

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या भावात सुधारणा दिसून आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.१५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२२ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. देशात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर होते. देशातील बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीन सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव आजही ४६०० ते ४७७५ रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसामध्ये सुधारणा

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा दिसून आली. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत ७०.०५ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे वाढून ५९ हजार २०० रुपये प्रतिखंडी होते. बाजार समित्यांमध्ये मात्र भाव स्थिर आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

गव्हाच्या भावात काहीशी वाढ

गव्हाला सणांमुळे मागणी वाढली आहे. सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी गव्हाची खरेदी करत आहेत. पण सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी दिसतो. त्यातच सरकारची गहू विक्रीही कमी झाली आहे. यामुळे गव्हाचे भाव गेल्या आठवडाभरात काहीसे वाढलेले दिसत आहेत. गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून १०० ते १५० रुपयांनी वाढला आहे. सध्या गव्हाचा प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ६०० ते ३ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील गव्हाची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.  

आल्याचे भाव टिकून

आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.    

मक्याचा भाव स्थिरावला

देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. यंदा मक्याला इथेनाॅल क्षेत्राकडून चांगली मागणी आहे. तसेच पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरु आहे. तर दुसरीकडे मक्याचा पुरवठा आणि बाजारातील आवक कमी दिसत आहे. परिणामी मक्याचे टिकून आहेत. पण सरकार धोरणांकडे बाजाराचे लक्ष असून दरवाढीवर काहीसा दबाव दिसत आहे. सध्या मक्याला देशात सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याला यापुढच्या काळातही चांगला उठाव राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT