Coriander
CorianderAgrowon

Coriander Leaves Rate : कोथिंबीर जुडीला उच्चांकी शेकडा चार हजारांपर्यंत दर

Market Update : गेल्या महिन्यात शेकडा केवळ शंभर ते दोनशे रुपये दर असणाऱ्या कोथिंबिरीचे दर एका महिन्यातच उच्चांकी टप्पा गाठत शेकडा चार हजारांपर्यंत पोहोचले आहेत.
Published on

Kolhapur News : गेल्या महिन्यात शेकडा केवळ शंभर ते दोनशे रुपये दर असणाऱ्या कोथिंबिरीचे दर एका महिन्यातच उच्चांकी टप्पा गाठत शेकडा चार हजारांपर्यंत पोहोचले आहेत. कोथिंबीर बाजारात मोठी तेजी असून गेल्या पंधरा दिवसांपासून सततच्या पावसाने कोथिंबिरीचे नुकसान झाल्याने कोथिंबिरीची आवक केवळ ३० टक्केच होत आहे.

सध्या कोल्हापूर बाजार समितीत कोथिंबिरीस शेकडा पंधराशे ते चार हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी दर आहे. सध्या गणेशोत्सव तोंडावर असल्याने आणखी काही दिवस ही तेजी टिकण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोथिंबीर उत्पादक भागामध्ये सातत्याने पाऊस होत असल्याने स्थानिक कोथिंबिरीची आवक रोडावली आहे.

Coriander
Coriander Rate : कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन, एका पेंडीला ५० रुपयांचा दर

सध्या बाजार समितीत निपाणी भागाबरोबरच मराठवाड्यातूनही कोथिंबिरीची आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात थांबूनथांबून जोरदार पाऊस पडत आहे. संततधार नसला तरी एक दोन तास जोरदार सरी होत असल्याने पाणी साचून राहत आहे. यामुळे विशेष करून पालेभाज्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला कुजून जात असल्याने पालेभाज्यांची आवक अतिशय मर्यादित स्वरूपात बाजार समितीत होत आहे.

Coriander
Coriander Market : कोथिंबीर आवकेत १०० क्‍विंटलची वाढ

मागणीत विशेष वाढ नसली तरी उपहारगृहे, हॉटेल ना दररोज लागेल इतकी कोथिंबीरही उपलब्ध होत असल्याने बाजारात कोथिंबिरीची मोठी चणचण भासत असल्याचे चित्र आहे.

कोथिंबीर उगवल्यानंतर सलग पाऊस सुरू झाला. शेतातील पाणी न हटल्याने आलेली कोथिंबीर बुडून नुकसान झाले. यामुळे सध्याच्या दराचा फायदा आम्हाला होत नसल्याचे चित्र आहे.
धोंडीराम पाटील, गणेशवाडी, जि. कोल्हापूर
कोथिंबिरीच्या मागणीत विशेष वाढ नसली तरी शिवारात होणारे नुकसानच कोथिंबिरीची आवक घटण्यास कारणीभूत ठरले आहे.
जमीर बागवान, भाजीपाला व्यापारी, कोल्हापूर बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com