Banana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export: खानदेशातून आखातात केळी निर्यातीत वाढ

Khandesh Banana Market: खानदेशातील केळी निर्यात गती घेत असून, दररोज १४ ते १६ कंटेनर परदेशी बाजारपेठेत पाठवले जात आहेत. सध्या निर्यातीच्या केळीला १९००-२१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे, मात्र बऱ्हाणपूर बाजारात आवक वाढल्याने दर काहीसे घसरले आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशातून आखातसह अन्य भागांत केळीची पाठवणूक गती घेत आहे. दर्जेदार केळी काढणीवर असून, रोज १४ ते १६ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सध्या होत आहे.

निर्यातीच्या केळीचे दर मागील महिनाभरापासून स्थिर आहेत. परंतु दरात काहीशी घसरणही झाली आहे. मध्यंतरी निर्यातीच्या केळीचे दर २३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. सध्या २१०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर निर्यातीच्या केळीस मिळत आहे.

सध्या धुळ्यासह नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांतून केळीची निर्यात होत आहे. सुमारे १५ कंपन्या निर्यातक्षम केळीची खरेदी जागेवर करीत असून, शेतातच प्रतवारी, स्वच्छता व बॉक्समध्ये पॅकींग करून केळीची पाठवणूक आखातात केली जात आहे.

नंदुरबारातून रोज पाच कंटेनर, धुळ्यातून तीन आणि जळगाव जिल्ह्यातून चार ते सहा कंटेनर केळीची निर्यात परदेशात होत आहे. मागील हंगामात निर्यातीच्या केळीचे दर मार्चमध्ये १४०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. परंतु यंदा दर बऱ्यापैकी आहेत. जळगाव जिल्ह्यातून चोपडा, यावल, रावेर व मुक्ताईनगरात निर्यातक्षम केळी अधिक आहे. धुळ्यातील शिरपूर आणि नंदुरबारात शहादा तालुक्यात निर्यातक्षम केळी अधिक आहे.

बऱ्हाणपूर येथे आवक

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीमधील दरांनुसार खानदेशात केळीचा दर निश्चित होतात. तेथे आवक मध्यंतरी कमी होती. यामुळे कमाल दर किंवा दर्जेदार केळीचे दर २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

परंतु तेथील आवकेत मागील चार ते पाच दिवसांत मोठी वाढ झाली असून, तेथील केळी दरपातळी कमाल १५५० रुपयांपर्यंत खाली आली आहे. दर किमान दर ८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. बऱ्हाणपुरात केळीची आवक प्रतिदिन ८० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT