Papaya Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Rate : खानदेशात पपईचे दर २० ते २४ रुपये किलो

Papaya Market : खानदेशातील पपईची आवक मागील काही दिवसांत रखडत सुरू आहे. पपईचे दर सध्या शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत २० ते २४ रुपये प्रतिकिलो, असे मिळत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील पपईची आवक मागील काही दिवसांत रखडत सुरू आहे. पपईचे दर सध्या शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत २० ते २४ रुपये प्रतिकिलो, असे मिळत आहेत. पपईला चांगली मागणी आहे.

खानदेशात ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पपईची आवक जोमात असते. यंदा पावसाचा फटका पिकास बसला आहे. सप्टेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी पाच ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी पपईची आवक होती. या काळात प्रतिकिलो सरासरी २३ ते २७ रुपये दर थेट खरेदीत शेतकऱ्यांना मिळाला.

या महिन्यातही आवकेत वाढ झालेली नाही. कारण पपई पक्व होण्याची क्रिया गतीने सुरू नाही. खानदेशात उन्हाळ्यात पपईची आवक कमी होते. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आवक कमी होती. ती अजूनही वाढलेली नाही. मार्चमध्ये पपईचे पीक हवे तसे उत्पादनक्षम राहिले नाही. फक्त काही वाणांचे पीक उत्पादनक्षम होते.

या क्षेत्रातून आवक सुरू होती. मार्चमध्ये प्रतिदिन सरासरी ४० ट्रक पपईची आवक खानदेशात झाली. यानंतर आवकेत सतत घट झाली. जूनमध्ये अल्प आवक होती. पावसाळ्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही आवक फारशी वाढली नाही. या महिन्यातील आवकही वाढत नसल्याने दर स्थिर आहेत. पपईची आवक आता डिसेंबरमध्येच वाढेल असेही जाणकार सांगत आहेत.

पंजाब, हरियाना, राजस्थान, दिल्ली, काश्मीर आदी भागांत खानदेशातून पपईची पाठवणूक केली जाते. मागील १० ते १२ दिवसांत किंवा उत्तरेकडे पाठवणूक रखडत सुरू आहे. कारण आवक कमी आहे. राज्यात नागपूर, मुंबई येथेही काही प्रमाणात पपईची पाठवणूक केली जाते, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT