Papaya Seedling : पपई रोपांच्या आगाऊ नोंदणीला प्रतिसाद

Papaya Cultivation : खानदेशात यंदा पपई दर टिकून आहेत. पाऊसही चांगला झाला आहे. यामुळे पपई लागवडीसंबंधी शेतकऱ्यांत नियोजन सुरू असून, रोपांच्या बुकींगला प्रतिसाद मिळत आहे.
Papaya
Papaya Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात यंदा पपई दर टिकून आहेत. पाऊसही चांगला झाला आहे. यामुळे पपई लागवडीसंबंधी शेतकऱ्यांत नियोजन सुरू असून, रोपांच्या बुकींगला प्रतिसाद मिळत आहे. लागवड अधिक होईल, असेही संकेत आहेत.

पपईसाठी खानदेशची ओळख असून, नंदुरबारातील लागवड दरवर्षी वाढत आहे. यंदा तेथे पाच हजार हेक्टरवर पपई लागवड झाली होती. खानदेशात मिळून सुमारे सात हजार हेक्टरवर पपई पीक होते. यंदाही लागवड वाढेल, असे संकेत आहेत. पाऊससमान, पपई दरांबाबत स्थिती बरी आहे.

Papaya
Papaya Cultivation : ‘अर्ली’ पपई लागवड खानदेशात पूर्ण

पपई लागवडीसंबंधी रोपांची बुकिंग सुरू असून, विविध कंपन्या, रोपवाटिकाचालक त्याबाबत प्रचार, प्रसिद्धी करीत आहेत. १५ नंबर व तैवान ७८६ या पपई वाणांसंबंधी आगाऊ नोंदणी रोपांचे पुरवठादार करीत आहेत. मध्य प्रदेश, गुजरातमधूनही त्यासंबंधी काही रोपवाटिकाचालक नंदुरबार, धुळ्यात कार्यवाही करीत आहेत. तसेच जळगावातही स्थानिक रोपवाटिकाचालक रोपांची आगाऊ नोंदणी करीत आहेत.

Papaya
Papaya Cultivation : पपई खालील मोठे क्षेत्र खानदेशात रिकामे

या महिन्यात नोंदणी केल्यास डिसेंबरमध्ये रोपांचा पुरवठा केला जाईल, असे सांगितले जात आहे. तर पुढील महिन्यात आगाऊ नोंदणी केल्यास रोपांचा पुरवठा जानेवारीअखेरीस केला जाईल, असे सांगितले जात आहे. पपई रोपांचे दर १० ते १२ रुपये १५ नंबर वाणाच्या एका रोपासाठी आहेत. तर ७८६ वाणासंबंधीचे दर १३ ते १४ रुपये प्रतिरोप, असे आहेत.

शेतकरी दोन्ही प्रकारच्या वाणांची आगाऊ नोंदणी करीत आहेत, परंतु त्यास यंदा कमी प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. पपईचे दर यंदा सुरवातीला ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो, असे होते. सध्या दर २८ रुपये प्रतिकिलो, असे आहेत. हा दर जागेवर मिळाला. दर मागील १० दिवसात स्थिर राहीले आहेत. काही शेतकऱ्यांना दर ४० रुपये प्रतिकिलो, असेही मिळाले होते. पाऊसमान चांगले असल्याने यंदा नंदुरबार, शहादा, जळगावमधील जळगाव, चोपडा भागातील लागवड होणार आहे. परिणामी रोपांचे दर स्थिर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com