Tur Market
Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : कळमना बाजारात तूरदरात सुधारणा

Team Agrowon

Tur Market नागपूर ः शेतकरी कंपन्यांसोबतच खासगी उद्योजकांचे तुरीवर प्रक्रिया (Tur Processing) करणारे उद्योग विदर्भात सर्वाधिक आहेत. त्याच कारणामुळे त्यांच्याकडून प्रक्रियेकामी तुरीची मागणी (Tur Demand) असल्याने तुरीच्या दरात (Tur Rate) फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत काहीशी सुधारणा अनुभवली जात आहे.

सध्या कळमना बाजारात येणाऱ्या तुरीला ७६०० ते ८४०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

कळमना बाजार समितीत भाजीपाला, फळांसह भुसार शेतमालाची आवक नियमित होते. सध्या विदर्भात तुरीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने बाजारातील तुरीची आवक वाढली आहे.

१ फेब्रुवारी रोजी कळमना बाजार समितीत २४३६ क्‍विंटल तुरीची आवक नोंदविण्यात आली. त्या वेळी तुरीला ६५०० ते ७६११ रुपये क्‍विंटलचा दर होता. त्यानंतरच्या काळात तुरीची आवक वाढती राहत ती ३००० क्‍विंटलपेक्षा अधिक होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तुरीच्या दरातील सुधारणा १७ फेब्रुवारीपासून झाली. ७००० ते ८३५० रुपयांनी या दिवशी तुरीचे व्यवहार झाले. त्यानंतरच्या कालावधीत तुरीचे दर ८००० रुपयांपेक्षा कमी राहिलेच नाही, असे व्यापारी सांगतात.

६ मार्च रोजी हे दर ८४०० रुपयांवर पोहोचले, आताही याच दराने तुरीचे व्यवहार होत असून या पुढील काळात त्यात काहीशी सुधारणा अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT