Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Bajarbhav : सोयाबीनच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा; शेतकऱ्यांना दिलासा

Anil Jadhao 

Pune News : सोयाबीनचा बाजार निचांकी पातळीवरून सुधारलेला दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सायंकाळपर्यंत सोयाबीन १० डाॅलर प्रतिबुशेल्सपर्यंत वाढले होते. नव्या हंगामातील माल बाजारात येणाच्या तोंडावर सोयाबीन दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव गेल्या चार वर्षातील निचांकी पातळीवर पोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन ९.४० डाॅलर प्रतिबुशेल्सपर्यंत घसरले होते. रुपयात हा भाव ३ हजार रुपयांपेक्षाही कमी होतो. तर भारतातील बाजारातही सोयाबीनचा भाव ४ हजारांपेक्षाही कमी झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव पडल्याचा दबाव देशातील बाजारावरही आला होता. त्यातच शेतकऱ्यांचा नवा माल बाजारात दाखल होण्यासाठी एका महिन्याचाच कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे चिंता वाढली होती. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव पडण्यामागे मुख्य कारण सोयाबीन उत्पादन वाढीचे आहे. जगात यंदा सोयाबीनचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटीना या देशांमध्ये यंदा सोयाबीनचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. परिणामी जागतिक सोयाबीन पुरवठा वाढेल, या अंदाजाने बाजार कमी झाला. 

बाजार कमी झाल्यानंतर गेल्या ४ वर्षातील निचांकी पातळीवर पोचला होता. भाव पडल्याने इतर देशातील शेतकरी सोयाबीनची लागवड कमी करतील, हा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे सोयाबीन बाजार बाॅटम रेटला जास्त दिवस राहणार नाही, दरात सुधारणा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. झालेही तसे. सोयाबीनचा भाव जवळपास ७ टक्क्यांनी सुधारला आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव पुन्हा १० डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत हा भाव मिळत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाल्यानंतर देशातील बाजारातही सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनच्या भावात मागच्या १५ दिवसांमध्ये क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांपर्यंत वाढ झाली. त्यामुळे सोयाबीन शिल्लक असलेल्या काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्रीदेखील केली. 

देशातील सोयाबीन सप्टेंबरच्या शेवटी बाजारात यायला सुरुवात होईल. तर ऑक्टोबर महिन्यात आवकेचा दबाव बाजारावर वाढेल. त्यामुळे नवा हंगामातील आवक वाढण्याआधी बाजारात सुधारणा आवश्यक होती. आता आंतरराष्ट्रीय बाजारातही सुधारणा दिसत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT