Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूसदरात सुधारणा; कमाल दर ७७०० रुपये

Cotton Rate : कापूस दरात सुधारणा झाली असून, कमाल दर ७७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. मध्यंतरी कमाल दर ७३०० ते ७४०० रुपये प्रतिक्विंटल होते.

Team Agrowon

Cotton Market Update Jalgaon : कापूस दरात (Cotton Rate) सुधारणा झाली असून, कमाल दर ७७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. मध्यंतरी कमाल दर ७३०० ते ७४०० रुपये प्रतिक्विंटल होते. खानदेशात अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री (Cotton Sale) केली आहे. धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा व धुळे भागात ७० टक्के कापसाची विक्री झाली आहे.

जळगावात यावल, रावेरात फारसे कापूस उत्पादन घेतले जात नाही. त्यातच अमळनेर, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, बोदवड, चोपडा आदी भागांतही किमान ६५ टक्के कापसाची विक्री झाली आहे. जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ भागात मात्र सुमारे ५५ ते ६० टक्केच विक्री झाली आहे.

देशात बाजारात सुमारे २०० लाख कापूसगाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवक झाली आहे. कापूस दरात सुधारणा होत असतानाच नफेखोर खरेदीदार, खिसेभरू व्यापारी शेतकऱ्यांकडे ८० टक्के कापूस शिल्लक आहे. दरांबाबत अनिश्चित स्थिती असल्याच्या बातम्या पेरत आहेत.

शेतकऱ्यांकडील कापूससाठ्याच्या चुकीच्या बातम्या पेरून कापूस बाजार सतत अस्थिर ठेवण्याचा, दरांवर दबाव कायम कसा राहील आणि आपली नफेखोरी सुसाट कशी पळेल, असा प्रयत्न काही संघटनांचे पदाधिकारी, खरेदीदार करीत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अचूक माहिती देणारी शासकीय संस्था नाही

देशात मूळात कापसाचे किती उत्पादन येते, याबाबत अचूक अंदाज, माहिती देणारी यंत्रणा, शासकीय संस्था नाही. खासगी संस्था आहेत. त्या संस्थांत कुठेही शेतकरी नाही किंवा कापूस उत्पादक दिसत नाहीत.

व्यापारी, उद्योजक, कारखानदार आदींच्या संघटना, संस्था आहेत. या संस्था मागील तीन ते चार वर्षे सतत कापूस उत्पादन, साठा याची चुकीची आकडेवारी, माहिती प्रसारित करीत आहेत. त्याचा प्रत्यय येत आहे.

यंदा म्हणजेच २०२२-२३ मध्ये ४०० लाख गाठींचे उत्पादन देशात येईल, मुबलक कापूस आहे, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला होता.

पण हा अंदाज चुकीचा ठरला आहे. या असोसिएशनने देशात ३१३ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज मध्यंतरी व्यक्त केला.

दुसरीकडे या असोसिएशनशी संलग्न मंडळी आपापल्या भागात सतत चुकीची माहिती कापूस दर, आवक, साठ्याबाबत देत आहेत. दोन-पाच गावे किंवा एक-दोन तालुक्यांमध्ये जी स्थिती आहे, ती देशभरात आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यातून कापूस दरांवर दबाव कसा राहील व शेतकरी आपला कापूस विक्रीस केव्हा काढतील, असा उद्देश संबंधित व्यापारी, पदाधिकाऱ्यांचा आहे. यामुळे भाबडा शेतकरी नाडला जात आहे.

चुकीची माहिती देणाऱ्यांचा बंदोबस्त करावा

खानदेशात रघुनाथदादा प्रणीत व शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने नाराजी व्यक्त करतानाच चुकीची माहिती देणाऱ्या खरेदीदार, व्यापारी व तज्ज्ञ म्हणून मिरविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते किरण पाटील यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanyadan Yojana: सरकारकडून विवाहखर्चासाठी २५ हजारांपर्यंत आर्थिक मदत; नवविवाहितांना मिळणार आधार

Agrowon Podcast: कारल्याचे दर टिकून; सोयाबीन दरात चढउतार, कापूस दरात सुधारणा, काकडीचे भाव टिकून, बाजरीचे दर टिकून

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर–डिसेंबर–जानेवारीचे पैसे एकत्र मिळणार !

Rabi Sowing: कोल्हापुरात रब्बीच्या ८७ टक्के पेरण्या पूर्ण

Farmer Relief Delay: ई-केवायसी प्रलंबित; शेतकरी मदतीपासून वंचित

SCROLL FOR NEXT