Cotton Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : पाकिस्तान, बांगलादेशकडून कापूस आयात वाढणार

भारताच्या शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेश हे मोठे कापूस वापरकर्ते देश आहेत. तसचं हे देश आयातीवर अवलंबून आहेत. त्यामुळं या देशांतील कापूस तुटवड्याचा भारताला प्रत्यक्ष, अप्रत्य फायदा होत असतो.

टीम ॲग्रोवन

पुणेः पाकिस्तानमधील कापूस उत्पादन (Pakistan Cotton Production) यंदा पुरामुळं घटलं. तसचं पाकिस्तानच्या बाजारातील कापूस आवक (Pakistan Market Cotton Import) यंदा मोठ्या प्रमाणात घटली. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) नरमल्यानं बांगलादेशच्या कापडाला मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीये. येथील कापड उद्योगाकडे (Textile Industry) मागणी येऊ लागली. त्यामुळं हे दोन्ही देशांकडून भारतीय कापसाला मागणी (Cotton Demand) वाढू शकते.

भारताच्या शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेश हे मोठे कापूस वापरकर्ते देश आहेत. तसचं हे देश आयातीवर अवलंबून आहेत. त्यामुळं या देशांतील कापूस तुटवड्याचा भारताला प्रत्यक्ष, अप्रत्य फायदा होत असतो. यंदा पाकिस्तानला पुराचा जोरदार तडाखा बसला. यात कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं. पाकिस्तानमधील सिंध, पंजाब आणि बलोचिस्तान मधील कापूस पीक पुरामध्ये उद्ध्वस्त झालं.

येथील कापड उद्योगाच्या मते यंदा पाकिस्तानमधील कापूस उत्पादन २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी होईल. त्याचं प्रतिबिंब सध्या बाजारात जाणवतंय. मागील दशकातील कापूस उत्पादन कमी राहण्याचं हे दुसरं वर्ष आहे. पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंतचं सर्वाधिक कापूस उत्पादन सात वर्षांपुर्वी १५० लाख गाठींचं झालं होतं. यंदा पाकिस्तानमध्ये लागवडही उद्दीष्टापेक्षा कमी झाली होती. त्यातच माॅन्सूननं कापूस पिकाला मोठा फटका दिला.

जून ते १ ऑक्टोबर या कालावधीत पाकिस्तानच्या बाजारातील कापूस आवक जवळपास २४ टक्क्यांनी घटली. मागीलवर्षी या काळातील कापूस आवक ३८ लाख ४६ हजार गाठीपर्यंत पोचली होती. मात्र यंदा २९ लाख ३६ हजार गाठींवरच आवक स्थिरावली. एका कापूस गाठ १७० किलो रुईची असते. यापैकी जवळपास २३ लाख गाठी कापूस कापड उद्योगाने विकत घेतला तर ५ हजार गाठींची निर्यात झाली. पाकिस्तानला यंदा जास्त कापूस आयात करावी लागणार आहे. अमेरिका हा पाकिस्तानाला कापूस पुरवठा करणारा महत्वाचा स्त्रोत असतो. मात्र यंदा अमेरिकाही उत्पादन घटीला तोंड देतेय. त्यामुळं पाकिस्तानला भारत किंवा इतर देशांकडून कापूस घ्यावा लागलं.

बांगलादेशमधील कापड उद्योग सध्या कमी मागणीमुळं आडचणीत आलाय. जागतिक बाजातून कपड्यांना कमी उठाव मिळाला. त्यामुळं उद्योगांकडे साठा पडून आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कपड्यांना कमी उठाव आणि मजबूत होणारा डाॅलर, यामुळं कापसाचे दर कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर एक महिन्यापुर्वी १०५ ते १०६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. ते आता ८४ ते ८५ सेंटपर्यंत नरमले. परिणामी कापडाचेही दर नरमले. या परिस्थितीत कापडाला उठाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र बांगलादेशमधील कापड उद्योग आणि सूतगिरण्यांकडे तयार मालाचा मोठा साठा पडून आहे. त्यामुळं कापसाचे दर कमी झाले तरी सुतगिरण्या आणि कापड उद्योगाकडून लागेच मागणी वाढलेली नाही. पण उद्योग पुढील काही काळात पुर्वपदावर येण्याची शक्यता आहे. बांगलादेशमधून कापसाला मागणी वाढल्यास भारतातून निर्यात वाढेल. बांगलादेश नेहमी भारतातून कापूस आयात करत असतो.

पाकिस्तान आणि बांगलादेशमधील उद्योगाकडून मागणी वाढल्यास यंदा भारताला जास्त फायदा होईल. भारतातील कापूस उत्पादन उद्योगांच्या मते यंदा वाढणार आहे. तर शेतकरी उत्पादनात घट आल्याचं सांगतात. उद्योगाच्या अंदाजाप्रमाणं उत्पादन वाढलं तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं देशातील कापूस दर मजबूत स्थितीत राहतील. सध्या कापूस बाजारात चढ-उतार सुरु असले तरी शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो, असं जाणकार सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT