Cotton Rate : जागतिक कापड बाजार सुधारणेच्या वळणार

देशातील कापूस हंगाम (Cotton Season) आता सुरु झाला. यंदा लागवडीला विलंब झाल्याने बाजारातील आवकही उशीरा वाढेल. मात्र कापड बाजार मंदीत (Textile Industry) असल्याने कापसाला कमी उठाव राहील, असं सांगितले जात आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

देशातील कापूस हंगाम (Cotton Season) आता सुरु झाला. यंदा लागवडीला विलंब झाल्याने बाजारातील आवकही उशीरा वाढेल. मात्र कापड बाजार मंदीत (Textile Industry) असल्याने कापसाला कमी उठाव राहील, असं सांगितले जात आहे.

परिणामी कापूस बाजारात (Cotton Market) नरमाई दिसून आली. जागतिक महागाई (World Inflation) आणि मंदीच्या सावटामुळं कापड बाजारात उठाव कमी आहे, अशी चर्चा आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियनसह महत्वाच्या अर्थव्यवस्था संकटात आहेत. पण यापैकी बहुतेक बाजारपेठा आता सुधारणेच्या वळणार आहेत.

त्यातच अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादन घटले. चीनमध्येही हीच परिस्थिती आहे. याचा भारताला लाभ मिळेल का?

जगातील महत्वाच्या बाजारपेठा असलेल्या अर्थव्यवस्था सध्या महागाईच्या झळा सोसत आहेत. महागाई अनेक देशांमध्ये मागील ४० वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. यात अमेरिका, युरोपियन युनियनमधील देश, चीन, भारत, ऑस्ट्रेलिया आदी महत्वाच्या देशांचा समावेश होतो.

महागाई वाढल्यानं लोक अत्यावश्यक वस्तू म्हणजेच अन्नधान्य, आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य देत आहेत. मात्र जगात अन्नधान्यासह अत्यावश्यक सेवा महागल्यानं दैनंदीन गरजा पूर्ण करण्यासाठी नागरिकांना आपल्या उत्पन्नातील मोठा वाटा खर्च करावा लागत आहे.

महागाईला आळा घालण्यासाठी बहुतेक देशांच्या रिझर्व्ह बॅंकांनी व्याजदर वाढवले. त्यामुळं लोकांचे व्याजाचे हप्तेही वाढले. परिणामी लोकांना इतर वस्तुंवर खर्च कमी करावा लागत आहे. याचा फटका कापड उद्योगाला बसतोय.

कापड बाजाराचा विचार करता मागील दोन महिन्यांमध्ये काही देशांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली. मात्र अनेक देशांमध्ये स्थिती काळजी करण्यासारखी आहे. अनेक देशांमध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांमध्ये कापड व्यवसाय मंदच राहीला. मात्र कपड्यांना विचारणा वाढत आहे.

जुलै महिन्यातील व्यवसाय मागील २६ महिन्यांतील निचांकी पातळीवर होता. त्यात ऑगस्ट महिन्यात काहीशी वाढ नोंदवण्यात आली. मात्र अपेक्षेप्रमाणे व्यवसाय नसल्याचं अनेक अहवालांमधून स्पष्ट झाले. 

जागतिक पातळीवर मागील काही महिन्यांपासून कापड बाजार आणि उद्योग अडचणीत होते. महागाई हे त्याचे मूळ कारण होते. मात्र आता भारतासह काही देशांमध्ये परिस्थिती सुधारत आहे. भारत आणि इतर महत्वाच्या बाजारपेठांमध्ये सणांची मागणी येतेय. पुढील महिनाभरात जागतिक कापड बाजार सुधारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याचा फायदा भारतीय कापसाला होऊ शकतो. यंदा अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये उत्पादन घटले. चीनमध्येही अतिउष्णतेमुळे उत्पादन कमी झाले. त्यामुळे वाढलेली मागणी भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. यंदा देशात कापूस उत्पादन वाढेल, असं सांगितलं जाते. मात्र शेतकऱ्यांच्या मते उत्पादनात यंदाही घट आहे.

परिणामी गेल्यावर्षीऐवढेच उत्पादन होईल, अशी शक्यता काही जाणकार व्यक्त करत आहेत. देशात यंदा उत्पादन काहीसे वाढले तरी बाजार मजबूत स्थितीत राहील, असा अंदाज बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

देशातील कापूस बाजारात सध्या दर काहीसे नरमले असले तरी पुढील महिन्याच्या शेवटी बाजार सुधारणा दाखवेल. त्यामुे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री बाजाराचा आढावा घेऊन करावी, असे आवाहनही जाणकारांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com