Dragon Fruit Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dragon Fruit Rate : परतीच्या पावसाचा ड्रॅगन फ्रूटच्या विक्रीवर परिणाम; बाजारातील मागणीत घट

Weather Effects on Dragon Fruits Sale : मागील आठवड्यात परतीच्या पावसाचा फटका ड्रॅगन फ्रूटच्या विक्रीवर झाला. परिणामी, बाजारपेठेत मागणी घटली. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटच्या दरात घसरण झाली.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : मागील आठवड्यात परतीच्या पावसाचा फटका ड्रॅगन फ्रूटच्या विक्रीवर झाला. परिणामी, बाजारपेठेत मागणी घटली. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटच्या दरात घसरण झाली. मात्र सध्या ड्रॅगन फ्रूटला प्रति किलो सरासरी १०० रुपये असा दर मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत प्रति किलोस ३० ते ४० रुपयांनी दर कमी झाले असल्याने ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

राज्यातील ड्रॅगन फ्रूटचे पहिला, दुसरा, तिसरा बहरातील विक्री आटोपली आहे. सध्या चौथा बहरातील ड्रॅगन फ्रूटची विक्री मध्यावर आली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ड्रॅगन फ्रूटला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने उठावही अपेक्षित असल्याने दर टिकून राहिले. सप्टेंबर महिन्यात ड्रॅगन फ्रूटला १०० ते १४० रुपये असे दर होते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असेच दर होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

मागील आठवड्यात अनेक भागांत परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटची मागणी होती. परंतु पावसामुळे ड्रॅगन फ्रूटची मागणी काहीशी कमी झाली होती. याचा परिणाम ड्रॅगन फ्रूटच्या दरावर झाला. परिणामी, या फळाच्या दरात प्रति किलोस ३० ते ४० रुपयांनी घटले. त्यामुळे शेतकरी काहीसा संकटात सापडला आहे. सध्या जरी पावसाने उघडीप दिली असली, तरी मागणी कमी झाली नाही.

सोलापूर जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भात भागात ड्रॅगन फ्रूटचा हंगाम नोव्हेंबरअखेर चालतो. ड्रॅगन फ्रूटचा चौथा बहर मध्यावर आला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून पाचव्या बहरातील ड्रॅगन फ्रूटची काढणी सुरू होईल. सध्या या फळाला पोषक वातावरण असल्याने फळाचा दर्जा, आणि उत्पादन चांगले आहे. त्यामुळे येत्या पंधरा ते वीस दिवसांत बाजारात ड्रॅगन फ्रूटच्या आवकेत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात दर कमी अधिक होण्याची शक्यता आहे. परंतु बाजारपेठेतील आवक आणि मागणीनुसार दर टिकून राहतील अशी आशा आहे.

सांगली जिल्ह्यातील हंगाम अंतिम टप्प्यात

सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कडेगाव, मिरज या तालुक्यांत ड्रॅगन फ्रूटची लागवड आहे. त्यापैकी जत तालुक्यात सर्वाधिक लागवड या फळाची आहे. ड्रॅगन फ्रूटचा हंगाम मे महिन्याच्या मध्यापासून सुरू होतो. मे महिन्यापासून ऑक्टोबर असा पाच महिने हंगाम सुरू असतो. जिल्ह्यातील ड्रॅगन फ्रूटचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, येत्या आठ ते दहा दिवसांत हंगाम संपण्याची शक्यता आहे.

ड्रॅगन फ्रूटचा यंदाचा हंगामात मागणी आणि उठाव चांगला झाल्याने अपेक्षित दर मिळाले. परंतु वातावरणातील बदलाचा काहीसा परिणाम सध्या दरावर झाला आहे. परंतु येत्या महिना, दीड महिन्यात दर टिकून राहतील अशी शक्यता आहे.
महेश आसबे, ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी वासूद अकोला, ता. सांगोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT