Sangli News : चीनमधून बेकायदेशीररित्या आलेला बेदाणा देशातील विविध बाजारपेठांत विक्रीस पोहोचला आहे. परिणामी, बेदाण्याच्या दरात गेल्या आठवड्यात प्रति किलो ३० रुपयांची गेल्या वीस दिवसांत ६० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी झळ बसलीआहे.
येत्या पंधरा दिवसांतही बेदाण्याची आवक वाढू शकते, असा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे. बेकायदेशीर येणारा बेदाणा थांबला नाही तर दर कमी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यापूर्वी बेदाण्याची आवक किती झाली, याचा नेमका अंदाज नसल्याने दर टिकून राहतील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तो अंदाज फोल ठरला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चीनच्या बेदाण्याची आवक सुरू आहे. यामध्ये कायदेशीर बेदाणा फक्त १७५ टन आला असल्याचा दावा द्राक्ष संघाने व्यक्त केला आहे. असे असताना बेदाण्याचे दर कमी का झाले असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. परंतु बेकायदेशीर बेदाण्याची आवक ५ हजार टन झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या मुंबईसह अन्य राज्यांत बेदाणा विक्रीसाठी पोहोचला असल्याने
जुलै महिन्याच्या मध्यापासून ते ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बेदाण्याचे दर दोन वेळा कमी झाले आहेत. अर्थात, पंधरा ते वीस दिवसांत प्रति किलोस ६० रुपयांनी दर कमी झाले आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी झळ बसली आहे. सध्या चीन आणि इराक या दोन देशांतील बेदाणा भारतात कायदेशीररीत्या आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
त्यामुळे केंद्राने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अफगाणिस्तानमधून येणाऱ्या बेदाण्याला आयत कर नाही. त्यामुळे या ठिकाणाहून येणाऱ्या बेदाण्याला आयात कर लावावा, अशी मागणी द्राक्ष संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण आणि शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यात प्रामुख्याने सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेदाण्याचे उत्पादन होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो.
प्रश्नाकडे दुर्लक्ष
बेकायदेशीर बेदाणा आयात होत असल्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर कुंडल येथील आढावात बैठकीत प्रश्न उपस्थित केला. परंतु पालकमंत्री यांनी याबाबत कसलीही चर्चा केली नाही. या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आमचा प्रश्न कसा सुटणार, असा प्रश्न द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
बेदाणा दर दृष्टिक्षेप
प्रतवारी...१४ जुलै २०२५ ....८ ऑगस्ट २०२५
हिरवा...३३० ते ४२०...३५० ते ३९०
लांब सुंटेखानी..३५० ते ४५०...३५० ते ३९०
पिवळा...३२० ते ४००...३०० ते ३५०
हिरवा...१०० ते १५०...७० ते १३०
ज्या व्यापाऱ्यांनी अंडरबिलिंग (चुकीचे बिल) करून बेदाणा आयात केला आहे. त्यांनी केंद्र व राज्य शासनाचा आयात शुल्क व जीएसटी बुडवला आहे. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांचे पुरावे आम्ही सादर केले आहेत. त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून आयात झालेला शिल्लक बेदाणा जप्त करावा.- मारुती चव्हाण, उपाध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ
अफगाणिस्तानचा रंग मिश्रित व रेसिड्यू असलेला बेदाणा देशात येत असून, तो आरोग्यास घातक आहे. पोर्टवर बेदाणा आल्यानंतर अन्न औषध प्रशासन आणि कस्टम विभागाने त्याची तपासणी करावी. तो खाण्यास योग्य असेल तर विक्रीस परवानगी द्यावी, अन्यथा विक्रीस परवानगी देवू नये. त्या बेदाण्याची विल्हेवाट लावावी.- सुशील हडदरे बेदाणा व्यापारी, सांगली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.