Illegal Raisin Import: बेकायदा बेदाणा आयातदारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

Farmer Protest: बेकायदेशीर बेदाणा आयातीला आळा घाला, यासह विविध मागण्यांसाठी द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
March on the Collector's Office
March on the Collector's OfficeAgrowon
Published on
Updated on

Sangli News: बेकायदेशीर पद्धतीने भारतात येणाऱ्या बेदाण्यावर केंद्राने बंदी घालावी. हा बेदाणा आयात करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करत सरकारने आम्हाला सुविधा दिल्यास कोट्यवधींचे परकीय चलन मिळवून देऊ, असा दावा महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी केला.

बेकायदेशीर बेदाणा आयातीला आळा घाला, यासह विविध मागण्यांसाठी द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचा प्रारंभ विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून झाला. ‘एक है तो सेफ है, बेकायदेशीर बेदाण्यावर बंदी घाला,’ अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या.

March on the Collector's Office
Farmer Protest: शेतीपिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

या वेळी द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष जगन्नाथ मस्के, सुभाष आर्वे, सांगली विभागीय अध्यक्ष दत्ताजी पाटील, सचिव तुकाराम माळी, बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, संचालक संग्राम पाटील, माजी सभापती दिनकर पाटील, बेदाणा व्यापारी सुशील हडदरे, वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक हर्षवर्धन पाटील,

यासह सांगली जिल्ह्यासह नाशिक, सोलापूर आणि कर्नाटकातील द्राक्ष, बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. बेदाणा व्यापारी असोसिएशन, कोल्ड स्टोरेज असोसिएशन, सांगली, तासगाव बाजार समिती, सांगली अॅग्रीकल्चर इन्पुट्‍स डीलर्स असोसिएशन यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला.

March on the Collector's Office
Farmers Protest: कृषिमंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचे ‘पत्ते फेक' आंदोलन उग्र

मारुती चव्हाण म्हणाले, ‘‘हवालामार्फत पैसे पाठवून खोटे बिल करून शासनाला फसवण्याचा उद्योग सुरू आहे. चीनमधून ७७ -७८ रुपये प्रति किलो या दराने बेदाणा येतो. हा बेदाणा चार व्यापाऱ्यांनी बेकायदेशीरपणे आणला आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.’’

बेदाणा नियंत्रण समिती नेमणार

नॅशनल ड्रायफ्रूट कॉर्पोरेशनला बेदाणा कोणत्या देशातून किती येतो याची माहिती असते. दर महिन्याला ‘एनडीएफसी’चा जो अहवाल येतो. त्याची माहिती द्राक्ष बागायतदार, बाजार समिती, व्यापारी यांना मिळाली पाहिजे यासाठी पुढील महिन्यात द्राक्ष संघ, सांगली व तासगाव बाजार समिती, व्यापारी, बेदाणा नियंत्रण समिती नेमणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com