Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यातील हंगामात सहभाग घेतलेल्या २६ कारखान्यांपैकी ६ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असून २० कारखान्यांचे ऊस गाळप अजूनही सुरू आहे. .प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, तीन मार्च अखेरपर्यंत ऊस गाळप हंगाम आटोपलेल्या कारखान्यांमध्ये नंदुरबारमधील दोन, जळगावमधील एक, छत्रपती संभाजीनगरमधील दोन व बीडमधील एका कारखान्याचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यातच जवळपास सर्व सहा कारखान्याचे गाळप आटोपले आहे.ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे..Sugarcane Crushing Season: सांगलीतील नऊ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला.यंदाच्या ऊस गाळप हंगामात खानदेशातील नंदुरबार, जळगाव व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या पाच जिल्ह्यांतून २६ कारखाने सहभागी झाले..Sugarcane Crushing Season: धाराशिवच्या ऊस गाळप हंगामाचा ‘विक्रमी’ गोडवा .या कारखान्यांनी १ कोटी १४ लाख ४२ हजार ९४० टन उसाचे गाळप केले. गाळप हंगामात सहभागी झालेल्या १५ सहकारी साखर कारखान्यांनी २४ फेब्रुवारी अखेरपर्यंत सुमारे ४९ लाख ४५ हजार २७५ टन उसाचे गाळप केले..या गाळपातून सरासरी ७.७१ टक्के साखर उताऱ्याने ३८ लाख ४५ हजार ७४२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. दुसरीकडे १० खासगी साखर कारखान्यांनी ६४ लाख ५७ हजार ६६८ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.५१ टक्के साखर उताऱ्याने ५४ लाख ९४ हजार ४६५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्यावतीने देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.