Turmeric Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market : वसमतमध्ये हळदीला उच्चांकी ३० हजारांचा दर

Turmeric Market Update : देशातील हळदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या वसमत बाजार समितीत यंदा हळदीच्या दरात तेजी आली आहे.

माणिक रासवे

Hingoli News : देशातील हळदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या वसमत बाजार समितीत यंदा हळदीच्या दरात तेजी आली आहे. कमाल दराचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित होत आहेत. शुक्रवारी (ता. ४) हळदीची २ हजार ३९४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १२ हजार १०० ते कमाल ३० हजार रुपये तर सरासरी २१ हजार ५० रुपये दर मिळाले. वसमत बाजार समितीच्या इतिहासात सेलम वाणाच्या हळदीला मिळालेला हा सर्वोच्च कमाल दर आहे.

शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील डिग्रस (ता. परभणी) येथील शेतकरी शेषराव भुजंगराव बोंबले यांच्या सुमारे ६ क्विंटल (११ कट्टे) हळदीला (हळद कांडी) प्रतिक्विंटल ३० हजार रुपये दर मिळाला.

गुरुवारी (ता.३) प्रतिक्विंटल किमान १० हजार ५९४ ते कमाल १६ हजार रुपये तर सरासरी १३ हजार १०५ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.१) हळदीची ३२४९ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल किमान ११२५० ते कमाल २०००० रुपये तर सरासरी १५६२५ रुपये दर मिळाले.

हिंगोली जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये यंदा जूनपासून हळदीच्या दरात सुधारणा होत आहे. जुलैमध्ये कमाल दर २० हजारांवर पोहोचले. २० जुलै रोजी उच्चांकी कमाल २२ हजार रुपये तर १९ जुलै रोजी कमाल २० हजार रुपये दर मिळाले होते.

एप्रिलमधील अवकाळी पावसामुळे शेतात वाळवत घातलेली हळद भिजल्यामुळे मालाच्या दर्जावर परिणाम झाला. त्यामुळे सुरवातीला कमी दर मिळत होते. परंतु तेजीमुळे भिजलेल्या हळदीला आता १० हजार रुपयांवर दर मिळत आहेत.

बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा मेमध्येच मोठ्या प्रमाणावर हळदीची विक्री केली. त्यामुळे सध्या आवक निम्म्यावर आली. सेलम वाणाच्या हळदीला शुक्रवारी मिळालेला सर्वाधिक दर आहे.
- एस. एन. शिंदे, सचिव, वसमत बाजार समिती.
दहा वर्षांपासून हळदीचे उत्पादन घेत आहे. यंदा २ एकरात ७० क्विंटल हळद झाली. प्रतवारी करून वसमत बाजार समितीत विकलेल्या ६ क्विंटल हळद कांडीला प्रतिक्विंटल ३० हजार रुपये दर मिळाला.
- शेषराव बोंबले, शेतकरी, डिग्रस, ता. परभणी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

BJP Mahayuti Victory : ...हा तर विक्रमी जनादेश, महाराष्ट्राचा पंतप्रधान मोदींवर विश्वास- फडणवीस

Dry Fruit Imports India : ट्रम्प यांनी इराणाला दिलेल्या इशाऱ्यानंतर भारतीय सुका मेवा व्यापाऱ्यांची चिंता वाढली; आयात ठप्प होण्याची भीती

Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात भाजपची जोरदार मुसंडी, जाणून घ्या महापालिकानिहाय निकाल

Nano Fertilizers: शाश्वत शेतीसाठी नॅनो खतांचा वापर गरजेचा

Kidney Sale: किडनी घेता का कुणी किडनी..?

SCROLL FOR NEXT