Turmeric Market : दर्जेदार हळदीला मिळवले चांगले मार्केट

Turmeric Production : सुतार यांनी २ ते ३ प्रकारच्या हळद पावडर निर्मितीस सुरुवात केली आहे. दर्जेदार हळदीस चांगले मार्केट मिळविले आहे.
Turmeric Market
Turmeric MarketAgrowon
Published on
Updated on

शेतकरी ः प्रकाश सुतार
गाव ः इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली
हळदीचे क्षेत्र ः सेलम ३० गुंठे, रोमा १० गुंठे

Turmeric Crop : हळदीची मोठी बाजारपेठ म्हणून सांगली प्रसिद्ध आहे. वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील प्रकाश परशुराम सुतार यांनी प्रतिकूल परिस्थितीत बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर इस्लामपूर येथील महाविद्यालयात ३५ वर्षे अकाउंटंटची नोकरी केली. त्यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. गावातच नोकरी असल्याने शेती कामांकडे लक्ष देणे सोयीचे झाले. २०१३ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ लक्ष केंद्रित केले. मागील सात वर्षांपासून ते हळदीचे पीक घेत आहेत. फक्त पिकविलेली हळद विकण्यापेक्षा पावडरनिर्मिती करून विक्री केल्यास अधिक फायदा होईल ही बाब ध्यानात आली. त्यातून सुतार यांनी २ ते ३ प्रकारच्या हळद पावडर निर्मितीस सुरुवात केली आहे. दर्जेदार हळदीस चांगले मार्केट मिळविले आहे.

मुलगा पराग हा गुजरात येथे ‘फूड इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेत होता. तेथे त्यांनी सौरऊर्जेवरील ड्रायर आणि हळद प्रक्रियेविषयी अधिक माहिती घेतली. हळद मूल्यवर्धनासाठी ड्रायरची खरेदी केली. नैसर्गिक पद्धतीने हळद पावडरनिर्मिती सुरुवात झाली. सौरऊर्जेवरील ड्रायरमध्ये दोन ट्रेच्या माध्यमातून दोन क्विंटल हळद सुकवली जाते. त्यानंतर पॉलिश करून दर्जेदार पावडर निर्मिती केली जाते. हळद विक्रीसाठी ज्युपिटर फ्लक्स नावाने ब्रॅण्ड तयार केला आहे. हळद पावडर निर्मितीसाठी राहुरी कृषी विद्यापीठाचे हळदीचे रोमा हे नवीन वाण वापरले जाते. त्यात कुरकुमीनचे प्रमाण अधिक असते.

Turmeric Market
Pomegranate Rate : दर्जेदार डागविरहित डाळिंबाला जागेवरच मिळवले ‘मार्केट’

लागवड नियोजन ः
- यंदा दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हळद लागवडीचे नियोजन केले आहे. त्यात सेलम जातीचे ३० गुंठे आणि रोमा जातीचे १० गुंठे क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे.
- लागवड नियोजनानुसार जमिनीची खोल नांगरट करून चांगली मशागत करून घेतली.
- दरवर्षी साधारण १० ते १५ मेच्या दरम्यान लागवड केली जाते. मात्र यंदा उष्णता जास्त असल्यामुळे २५ मेला लागवडीचे नियोजन केले.
- लागवडीसाठी साडेचार फूट अंतराचे गादीवाफे तयार करून घेतले.
- सिंचनासाठी पाटपाणी पद्धतीचा अवलंब केला जातो. पाटपाणी पद्धतीने वाफसा पद्धतीने सिंचन करण्याचे नियोजन आहे.
- लागवडीसाठी घरचे १० क्विंटल बेणे वापरले. त्यासाठी बेण्याची स्वच्छता करून बेणेप्रक्रिया केली.
- दोन गड्ड्यांत बारा इंच अंतर राखत झिगझॅग पद्धतीने बेणे लागवड केली.
- बेणे लागण करताना प्रत्येक बेण्याखाली निंबोळी आणि करंजी पेंड तसेच सिलीकॉनचा वापर केला.
- तणनियंत्रणासाठी तणनाशक वापर टाळला जातो. त्याऐवजी खुरपणीद्वारे तणनियंत्रणावर भर दिला आहे.

खत नियोजन ः
लागवडीच्या साधारण दीड महिन्यानंतर पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी ह्युमिक, सिलिकॉन यांची शिफारशीप्रमाणे आळवणी केली.

कीड-रोग व्यवस्थापन ः
वाढीच्या अवस्थेत पिकावर पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करून प्रादुर्भाव आढळून आल्यास शिफारशीप्रमाणे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली जाईल.

आगामी नियोजन ः
- सध्या सतत पाऊस होत आहे. पावसाचे पाणी हळद लागवडीमध्ये साचून राहिल्यास पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा केला जाईल.
- पाऊस आणि जमिनीतील वाफसा यांचा अंदाज घेऊन पाटपाणी पद्धतीने सिंचन केले जाईल.

- लागवडीनंतर साधारण दोन महिन्यांनी पहिली भरणी केली जाते.
- कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातील.
- तणांचा प्रादुर्भाव पाहून आवश्यकतेनुसार खुरपणी केली जाईल.
- पिकाला चांगला फुटवा येण्यासाठी आणि पीक वाढीसाठी शिफारशीत घटकांची आळवणी केली जाईल.

- प्रकाश सुतार, ९२७२३१६००४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com