China Food Grain Production
China Food Grain Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

China Drought : दुष्काळामुळे चीनमध्ये धान्य उत्पादन घटणार

अनिल जाधव

पुणेः जगाला बदलत्या वातावरणाचा (Climate Change) मागील काही वर्षांपासून फटका बसत आहे. जगातील तब्बल १३५ देशांना दुष्काळाचा (Drought IN China) कमी अधिक प्रमाणात फटका बसत आहे. दुष्काळाचा आफ्रिकेतील (Africa Drought) देशांमध्ये होणारे नुकसान अधिक आहे. तर चीनमध्येही धान्य उत्पादनात (China Food Grain Production) मोठी घट येण्याची शक्यता आहे.

आफ्रिकेतील दक्षिण सुदान आणि युगांडामध्ये दुष्काळाची दाहकता भीषण आहे. तर सोमालिया, इथोपिया, केनिया या देशांमध्येही पावसाचं प्रमाण कमी राहीले. परिणामी या देशांमध्ये यंदा धान्य उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. म्हणजेच आफ्रिकेत यंदा अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. युरोपला यंदा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळामुळे युरोपमधील अनेक नद्या मागील काही महिन्यांपासून कोरड्या पडल्या. त्यामुळे बहुतेक देशांना पाणीटंचाई जाणवत आहेत. अनेक गावे आणि शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न भीषण बनत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.

चीनमध्ये यंदा अतिउष्णता आणि दुष्काळ अशी स्थिती निर्माण झाली. सध्या चीनमधील जवळपास ६६ नद्या आटल्या आहेत. या नद्या पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणारा प्रमुख स्त्रोत आहेत. केवळ नद्याच नाही आटल्या तर शेती सिंचनासाठी महत्वाच्या असलेल्या तलावांमध्ये केवळ ३० ते ३५ टक्के पाणी आहे. बहुतेक तलाव ७० टक्क्यांपर्यंत आटले आहेत. काही प्रांत ५०० वर्षातील सर्वात जास्त उष्णतेची लाट सहन करीत आहेत. चीनमध्ये मका आणि तांदूळ पिकाला दुष्काळाचा फटका मोठा फटका बसत आहे. यांगत्से नदीच्या पात्रात ही दोन पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मका पीक सध्या दाणे भरण्याच्या स्थितीत आहे. मात्र उष्णता आणि पाणीटंचाईमुळे उत्पादकतेवर परिणाम होत आहे. सध्या मका उत्पादक महत्वाच्या पाच प्रांतांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याचे अहवाल आहेत. परिणामी यंदा चीनमध्ये मका उत्पादन घटण्याची शक्यता आहे. असे झाल्यास चीनला अमेरिका आणि ब्राझीलमधून मका आयात करावी लागेल.

चीनधील सिचुआन प्रांतात तब्बल ७० दिवसांपेक्षा जास्त काळ उष्णतेची लाट होती. १९६१ नंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात उष्णता वाढली होती. उष्णतेमुळे दुष्काळी स्थितीची दाहकता अधिक वाढली. त्यामुळे चीनमध्ये शेतीला देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात येत आहे. याचा शेती उत्पानावर परिणाम परिणाम होत आहे. चीनच्या विविध विभागांनीही यंदा देशात धान्य उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे चीनी सरकारपुढे यंदा अन्नसुरक्षेचा प्रश्न उभा असेल. पाण्याची कमी उपलब्धता असल्याने यंदा चीन कोळशाचा वापर वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण चीनची जलविद्यूत निर्मिती ५० टक्क्यांनी घटली आहे.

चीनवर काय परिणाम होत आहे

- महत्वाच्या ६६ नद्या कोरड्या पडल्या

- सिंचनासाठी महत्वाच्या तलाव ७० टक्क्यांपर्यंत आटले

- शेती सिंचनासाठीचे पाणी कमी केले

- मका आणि तांदूळ पिकाला फटका बसत आहे

- उत्पादन घटल्याने मका आयात वाढवावी लागेल

- कापूस पिकाचेही उत्पादन घटण्याची शक्यता

- जलविद्यूत उत्पादन निम्म्यावर आले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT