Cotton procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Procurement : दिवाळीनंतर शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्त

Cotton Market : दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर शासकीय कापूस खरेदी सुरू होते. यंदा दिवाळीनंतर शासकीय कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर शासकीय कापूस खरेदी सुरू होते. यंदा दिवाळीनंतर शासकीय कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. पणन महासंघाच्या कापूस खरेदीचा प्रश्‍न अद्याप अंधातरी असून, ‘सीसीआय’ सहा केंद्रांवर खरेदी करणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर कापसाची लागवड होते. मात्र दरवर्षी कापूस खरेदीचा प्रश्‍न गुतांगुतीचा होतो. सद्यःस्थितीत कापसाचे दर हमीभावापेक्षा खाली आले आहेत.

दरात सुधारणा होण्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र अत्यंत गरजेचे आहे. असे असताना अजूनही शासकीय कापूस खरेदी सुरू झालेली नाही. यंदा संततधार पाऊस, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव अशा अनेक कारणांमुळे कापसाची उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात खुल्या बाजारातील कापसाचे दर हमीभावापेक्षा अधिक होते.

यंदा सुरुवातीला कापसाचे दर घसरले आहेत. खासगी बाजारातील दर पाहता शासकीय कापूस केंद्र सुरू होणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. मात्र, अजूनही शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्त ठरलेला नाही. सीसीआयने हमी न घेतल्याने गेल्या वर्षी पणन महासंघाने केंद्र सुरू केले नव्हते. यंदाही पणन केंद्र सुरू होण्याबाबत साशंकता आहे.

सीसीआयने केंद्र सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. सीसीआय जिल्हात यंदा सहा कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. गेल्या हंगामात ‘सीसीआय’ने देखील खुल्या बाजारातून कापूस खरेदीचे नियोजन केले होते. मात्र त्यानंतर माशी कुठे शिंकली, हे अद्याप समोर आलेले नाही.

‘पणन’ला सब एजंट म्हणून मान्यता नाही

‘सीसीआय’चा सब एजंट म्हणून पणन महासंघ दरवर्षी कापूस खरेदी करतो. गेल्यावर्षी प्रमाणे यंदा सीसीआयने पणनला सब एजंट म्हणून मान्यता दिलेली नाही. पणन महासंघाकडून राज्यात ५० केंद्रांवर कापूस खरेदी होत असते.

नागपूर, वणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, खामगाव, जळगाव, परभणी, नांदेड, परळी व औरंगाबाद या अकरा झोनमध्ये दोन टप्प्यांत कापूस खरेदीची सुरुवात पणन करते. यंदा महासंघाचे प्रयत्न सुरू असले, तरी शासन काय निर्णय घेणार, यावरच पणन केंद्राचे भविष्य अवलंबून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT