Gold Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Rate : सोने दरात घसरण सुरूच

Today's Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू असलेली दिसत आहे. आठवडाभरात सोने दर एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ९०० रुपयांनी घसरले.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू असलेली दिसत आहे. आठवडाभरात सोने दर एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ९०० रुपयांनी घसरले. सोन्याचा दर प्रतितोळा ६२ हजारांपर्यंत आहे. चांदी दरात मात्र कुठलीही घट झालेली नसल्याची स्थिती आहे.

खरेतर सोने-चांदीच्या दरात आखातातील अस्थिरता व अमेरिका, युरोपातील वित्तीय घडामोडींमुळे सतत चढउतार झाले. सोनेदर नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत वधारले. परंतु फेब्रुवारी महिन्यात नरमाई कायम दिसत आहे. मागील ४५ ते ४६ दिवस सोनेदर सतत कमी झाले आहेत.

जळगावच्या सुवर्ण बाजारात फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर प्रतितोळा ६३ हजार ४०० रुपये असे होते. तर चांदीचे दर प्रतिकिलो ७३ हजार रुपयांवर होते.

परंतु गेल्या १५ दिवसांत सोनेदर एक तोळ्यामागे १२०० रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच आठवडाभरात सोने दर एक तोळ्यामागे ९०० रुपयांनी घसरले आहेत, अशी माहिती बाजारातील विश्लेषकांनी दिली.

मागील पंधरवड्याच्या अखेरीस सोन्याचा दर ६३ हजार १०० रुपये प्रतिकोळा होता. त्यात मागील आठवड्यात घसरण झाली. दर सध्या विना जीएसटी ६२ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर स्थिर आहे.

चांदीदरातही मागील काही दिवसांत एक किलोमागे एक हजार रुपयांची घट झाली. चांदीचा दर प्रतिकिलो विना जीएसटी ७२ हजार रुपयांवर स्थिर आहे, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo 8th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर; शासन निर्णय जारी

MRGS Scheme: ‘एमआरजीएस’ योजनेत पाच कोटींच्या निधीवर प्रश्नचिन्ह

Freedom Of Religion Bill: धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ विधानसभेत सादर; मुस्लिम समाज लक्ष्य असल्याचा विरोधकांचा दावा

Sugar Factory Action: सोलापूर जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांवर जप्तीचा प्रस्ताव

Millet Farming: कुरुलमध्ये राळा, वरई, भगरीचा प्रयोग,संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT