Maharashtra Monsoon Update: राज्याच्या विविध भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. त्यामुळे बहुतांश भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..आज म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाच्या येलो अलर्टचा इशारा दिला आहे. .Heavy Rain Alert: विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा; मध्य महाराष्ट्रातही सरी हजेरी लावण्याचा अंदाज.तसेच ठाणे, रायगड, मुंबई, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, नंदुरबार, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..तर उद्या नंदुरबार, धुळे आणि नाशिक घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, मुंबई, ठाणे, पुणे घाटमाथा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. .Maharashtra Monsoon: राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.तसेच रायगड, रत्नागिरी, सातारा, सातारा घाटमाथा, पुणे, पुणे घाटमाथा, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. .सोमवारी नंदुरबार, नाशिक घाटमाथ्या जोरदार पावसाची शक्यता असून अहिल्यानगर, पुणे घाटमाथ्यासह पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर नांदेड, परभणी, बीड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मंगळवारपासून मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. मंगळवारी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.