Job Vacancies: वाशिम जिल्ह्यातील विविध शासकीय तसेच खासगी आस्थापनांमधील रिक्त पदे अधिसूचित करून ती तातडीने भरण्याची कार्यवाही करावी. तसेच उद्योजक व आस्थापनांनी त्यांच्या रिक्त पदांची पूर्तता रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले..कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर ‘रोजगार महाकुंभ’ अंतर्गत रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी रोजगार मेळावे होणार आहेत. .Uday Samant: प्रकल्पबाधितांना उद्योगांमध्ये रोजगाराला प्राधान्य द्या; उद्योगमंत्री उदय सामंत.या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समिती तसेच जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समितीची संयुक्त बैठक घेण्यातआली..Rural Employment: ग्रामीण रोजगाराची गोची.या बैठकीत रोजगार मेळाव्यात अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. जिल्ह्यातील उद्योजक व विविध आस्थापनांनी सहभागी होऊन रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले. रोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही देण्यातआले..यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रवीण खंडारे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी वैशाली पवार तसेच समित्यांचे सदस्य उपस्थित होते. सदस्यांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनाबाबत सूचना व अभिप्राय मांडले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.