Gold Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Rate : सोन्याची दरवाढ सुरूच

Gold Market : सुवर्ण बाजारात सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. तीन दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात तोळ्यामागे ८०० रुपयांची वाढ झाली.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : सुवर्ण बाजारात सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. तीन दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात तोळ्यामागे ८०० रुपयांची वाढ झाली. यामुळे गेल्या महिनाभरात सोन्याच्या दरात सहा हजारांची वाढ झाली आहे.

गुरुवारच्या व शुक्रवारच्या (ता. १२) दराचा विचार करता सोन्याच्या दरात ८०० रुपयांची तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली आहे. यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला सोन्याच्या विक्रीवर विपरित परिणाम झाल्याचे दिसले आहे.

सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ७३ हजार ५४२ रुपये प्रतितोळा तर चांदी ८४ हजार ४६० पोहोचली आहे. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने सोने खरेदी ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यंदा मात्र सोन्याने ७३ हजारांचा टप्पा गाठल्याने या विक्रीवर परिणाम झाला आहे.

२९ मार्चला सोन्याचा दरात वाढ होऊन सोने ७० हजारांवर गेले होते. सोन्याने प्रतितोळा (दहा ग्रॅम जीएसटीसह) ७० हजारांचा टप्पा पार केला होता. सुवर्ण बाजारातील या उच्चांकामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. एकीकडे लग्नसराई, दुसरीकडे आगामी काही दिवसांत लोकसभा निवडणुका या पार्श्‍वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने आगामी काळात सोन्याचे महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होणार आहे.

गुंतवणूकदारांना लाभ

पाच ते २९ मार्च या कालावधीतील सोन्याच्या बाजाराचे चित्र पाहता पंचवीस दिवसांत सोन्याच्या दरात सहा हजारांची वाढ तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ झाली आहे. एका महिन्यात एवढा मोठा परतावा सोने, चांदीने दिल्याने गुंतवणूकदार सोने, चांदी खरेदीकडे वळले आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चांदीचा दर ७२ हजार ५०० रुपये प्रतिकिलो होता.

२ एप्रिलला सोन्याचा दर ‘विना जीएसटी’ ६८ हजार ७०० तर चांदीचा दर ७७ हजारांवर होता. त्यात सोन्याच्या दरात ७०० ची वाढ होऊन सोने विना जीएसटी ६९ हजार ४०० वर गेले आहे. चांदी दर ७७ हजारांवर होते. त्यात आणखी एक हजाराची वाढ होऊन चांदी ७८ हजारांवर पोहोचली आहे. ३ एप्रिलला ‘जीएसटी’सह सोने प्रतितोळा ७१ हजार ४८२, चांदी प्रतिकिलो ८० हजार ३४० वर पोहोचली होती.

सोन्याचे काही दिवसांतील दर (विना जीएसटी)

तारीख--सोने (प्रतितोळा)--चांदी (प्रतिकिलो)

५ मार्च-- ६४ हजार ३००-- ७३ हजार

२९ मार्च--६८ हजार २००-- ७६ हजार

५ एप्रिल-- ७० हजार ६००-- ८१ हजार

८ एप्रिल --७१ हजार ४००-- ८२ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Adamapur Bhandara Yatra : बाळूमामांच्या जयघोषात आदमापूरच्या भंडारा यात्रेस सुरुवात; अतिवृष्टी, दुष्काळ आणि महागाईत वाढीची भाकणुक

Maize Procurement: 'इथेनॉल'साठी मक्याची हमीभावाने खरेदी केली जाते का?, मंत्री भुजबळांचा मोठा खुलासा

Bamani Solar Project: बामणी येथील सौर कृषी वाहिनी प्रकल्पास विभागीय आयुक्तांची भेट

Bhausaheb Thorat Punyatithi: आंदोलने, चळवळीतून विकासाचा भक्कम पाया ; मल्हार अरणकल्ले

Tararani Festival: कोल्हापुरात ताराराणी महोत्सवास प्रारंभ

SCROLL FOR NEXT