Gold Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Rate : सोने दरात वाढ सुरूच

Gold Market Update : सोने दरात या आठवड्यात सतत वाढ झाली असून, दर (जीएसटीसह) ७१ हजार ४९० रुपये प्रतितोळा झाले आहेत. चांदी दरातही वाढ झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : सोने दरात या आठवड्यात सतत वाढ झाली असून, दर (जीएसटीसह) ७१ हजार ४९० रुपये प्रतितोळा झाले आहेत. चांदी दरातही वाढ झाली आहे. सोने दरवाढीचा नवा विक्रम या आठवड्यातही झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेतही दिसून येत आहे. देशातील अग्रगण्य सुवर्णपेठ असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदी दराचा नवा विक्रम नोंदविण्यात आला आहे.

सोन्याच्या दराने ७० हजारांचा आकडा पार केला. दुसरीकडे चांदीनेही ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी ९ मार्च रोजी सोने ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळा होते. तर जीएसटीसह सोन्याचे दर ६७ हजार ५०० रुपये प्रतितोळा होते.

चांदीचा दरही वाढला

जळगावात चांदीचे दर ८० हजार ३४० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. ६ मार्च रोजी ७२ हजार ८०० रुपये असलेल्या चांदीच्या दारातही मागील तीन - चार दिवसांत एक किलोमागे १२०० रुपये वाढ झाली.

चांदीचे दर ७४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. ५ ते २९ मार्चदरम्यान सोन्याच्या दरात एक तोळ्यामागे सहा हजारांची, तर चांदीच्या दरात एक किलोमागे तीन हजारांची वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 21st Installment Date: शेतकऱ्यांना दिवाळीत पीएम किसानचा २१ वा हप्ता मिळेल का?; तपासा तुमचे लाभार्थी स्टेटस

Crop Insurance Payment : सिंधुदुर्गात बागायतदारांना विमा वितरणास सुरुवात

Crop Damage Survey : पीकहानीचे पंचनामे सुरूच; कमी मनुष्यबळाचा परिणाम

Agrowon Podcast: शेवगा तेजीतच, सोयाबीन दर कमीच, बीटला उठाव, वांगी दर टिकून तर सीताफळ आवक स्थिर

Rabi Sowing : रब्बी पेरणी रखडत दीपोत्सवानंतर वेग शक्य

SCROLL FOR NEXT