Gold Rate : सोन्याचा नवा उच्चांक; दर ६८ हजार ५०० वर

Todays Gold Rate : अमेरिकेतील बँकांची स्थिती बिकट झाल्याने मार्चच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या भाव वाढ सुरू आहे.
Gold Rate
Gold RateAgrowon

Nagpur News : अमेरिकेतील बँकांची स्थिती बिकट झाल्याने मार्चच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या भाव वाढ सुरू आहे. त्यामुळे सोनेदर नवनवे उच्चांक गाठत आहे. गुरुवारी (ता. २८) सोने ६७ हजार ५०० रुपये प्रतिदहा ग्रॅम झाले.

त्यानंतर शुक्रवारी (ता. २९) त्यात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ६८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. गेल्या पंधरा दिवसांत सोनेदरात तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

Gold Rate
Gold Market Rate : सोने-चांदी दरात वाढ सुरूच

अमेरिकेतील बँकांची बिकट झालेली स्थिती सुधारत नसताना त्यांनी व्याजदर आणखी कमी केल्याने विदेशात मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे भाव मोठ्या प्रमाणात व झपाट्याने वाढत आहेत.

Gold Rate
Gold Silver Rate : लग्नसराईत सोन्याने गाठला ७० हजारांचा टप्पा

शिवाय इतरही विकसित देशांनी सोन्याची खरेदी वाढविल्याने भाववाढ होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. ही भाववाढ लक्षात घेता सोन्याचे दर लवकरच ७० हजारांच्या घरात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मार्च महिन्यातील दरस्थिती

तारीख... सोने...चांदी

१५ मार्च... ६५,६००... ७५,०००

२० मार्च... ६६,०००... ७४,५००

२६ मार्च... ६६,६००... ७४,८००

२८ मार्च... ६७,२००... ७५,०००

३० मार्च... ६८,५००... ७५,३००

अमेरिकेतील बँकांची स्थिती बिकट होण्यासह आता तेथील बँकांनी व्याजदर आणखी कमी केल्याने विदेशात सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे भाव झपाट्याने वाढत आहेत. ही वाढ अशीच कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोने ७५ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.
- राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com