Gold Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Market Rate : सोने-चांदी दरात वाढ सुरूच

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे. सध्या लग्नसराईमुळे सोन्याच्या दागिन्यांना मागणी असली तरी ग्राहकांना सध्या जास्त किंमत मोजावी लागत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : सोने-चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे. सध्या लग्नसराईमुळे सोन्याच्या दागिन्यांना मागणी असली तरी ग्राहकांना सध्या जास्त किंमत मोजावी लागत आहे. मात्र सोन्यात गुंतवणुकीलाही अनेकांकडून प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे मागणी कायम आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या दर वाढत असल्याने ग्राहकांना जादा किमतीने दागिने खरेदी करावी लागत आहे.

जागतिक स्तरावर आलेली अस्थिरता आणि लग्नसराई यामुळे सध्या सोने-चांदीची मागणी वाढली आहे. लग्नसराईत सर्वाधिक सोन्याची खरेदी होत असताना गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. पुढील काही दिवसांत सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असून भावदेखील वाढतील, असे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.

अनेक दिवसांपासून फारसा चढ-उतार नसलेल्या सोन्याच्या दरात मार्चच्या सुरवातीपासून वाढ सुरू झाली. १० फेब्रुवारीला ६२ हजार ९०० रुपये असलेले सोने महिनाभरात तीन हजार शंभर रुपयांनी वधारले. स्थानिक सराफा बाजारात सध्या सोने (२४ कॅरेट) प्रतिदहा ग्रॅम ६५ हजार ५०० (विना जीएसटी), तर चांदी प्रतिकिलो ७५ हजारांवर पोहोचली आहे. दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लग्नसराईच्या काळात दागिन्यांत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. स्थानिक बाजारात सोन्यातील दरवाढ कायम आहे. मागील सहा दिवसांत दोन हजार २५० रुपयांनी वाढ झाली. चांदी प्रतिकिलो ७५ हजारांपर्यंत पोहोचली आहे. बुधवारी (ता. १३) सोन्याचे दर प्रतिदहा ग्रॅम ६५ हजार ३०० रुपये (जीएसटी वगळून) होते. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी मे मध्ये सोन्याने ६२ हजारांचा टप्पा ओलांडला होता.

सोने, चांदीचे दर

तारीख-सोने (प्रति तोळा)-चांदी (प्रति किलो)

१ मार्च-६२ हजार ५००-७१ हजार

५ मार्च-६४ हजार ३००-७३ हजार

८ मार्च-६४ हजार ८००-७४ हजार

१६ मार्च-६५ हजार ५००-७५ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT