Ahilyanagar News: Bhausaheb Thoratसहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा आणि मनाचा सच्चेपणा जपला. .अांदोलने, चळवळीतूनच संगमनेर तालुक्याच्या विकासाचा पाया रचला गेला असे मत ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक मल्हार अरणकल्ले यांनी व्यक्त केले. संगमनेर येथे अमृत उद्योग समूहातर्फे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रेरणास्थळ येथे अभिवादन केले..Bhausaheb Thorat Jayanti: संगमनेर येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन.माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड. माधव कानवडे, सहकारमहर्षी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पा. घुले, दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, उल्हास लाटकर, रणजितसिंह देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते..Bhausaheb Thorat Sugar Factory : थोरात कारखाना राबविणार ऊसविकास योजना.मल्हार अरणकल्ले म्हणाले, वयाच्या १९ व्या वर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यासाठी आयुष्य समर्पित केले. स्वातंत्र्यसंग्राम, सर्वसामान्यांसाठीची तळमळ, आंदोलने, चळवळी, मोर्चे यांसह तालुक्याच्या विकासाची भक्कम पायाभरणी करत त्यांनी सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले..वयाच्या ८४ व्या वर्षीही ‘दंडकारण्य अभियान’ राबविणारे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे समाजविकासासाठी आयुष्यभर झटणारे कृतिशील व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी सहकारातून तालुका घडवला. सहकार, शेती, शिक्षण आणि दुग्धव्यवसाय यांच्या माध्यमातून त्यांनी समृद्ध तालुका घडवला. संघर्ष, लढे, चळवळी, प्रखर ध्येयवाद आणि राष्ट्रवाद हे त्यांनी आयुष्यभर जपले. संगमनेर तालुक्याच्या हक्काच्या ३० टक्के पाण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.