Cashew Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market : गोवा सरकार काजू बोंड खरेदीची परवानगी देण्याचे संकेत

Cashew Production : गोव्यात काजू बोंडांपासून पेय व मद्यार्क तयार केले जातात. त्यामुळे तेथील बोंडांपासून काजू उत्पादकांना उत्पन्न मिळते.

Team Agrowon

Cashew Market Update : सिंधुदुर्गातील वाया जाणारा काजू बोंड खरेदी (Cashew Fruit Procurement) करण्यासाठी गोवा सरकार व्यापाऱ्यांना परवानगी देण्याचे संकेत आहेत. फळबागायतदार बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची भेट घेऊन चर्चा केली. परवानगीबाबत श्री. सावंत सकारात्मक असल्याची माहिती फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी दिली.

गोव्यात काजू बोंडांपासून पेय व मद्यार्क तयार केले जातात. त्यामुळे तेथील बोंडांपासून काजू उत्पादकांना उत्पन्न मिळते. परंतु गोव्याच्या हद्दीवर असलेल्या सिंधुदुर्गातील हजारो टन बोंड वाया जातो. गोवा हद्दीनजीक असलेले काही काजू उत्पादक गोव्याच्या व्यापाऱ्यांना काजू बोंडे किंवा बोंडांचा रस विक्री करीत होते.

परंतु त्याला कायदेशीर मान्यता नव्हती. परंतु नुकताच गोवा राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यामध्ये गोवा सरकारने काजूला १५० रुपये हमीभाव जाहीर केला. याशिवाय बोंडापासून पेय व मद्यार्क तयार करण्याची योजना देखील जाहीर केली.

त्या अनुषंगाने सिंधुदुर्गातील फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, मिलिंद शेटकर, राजेश सावंत, मयूर परब, गणपत गवस यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली.

सिंधुदुर्गात काजू बोंडांवर प्रकिया होत नाही. त्यामुळे सिंधुदुर्गातील बोंडे खरेदी करण्याची परवानगी गोवा सरकारने व्यापाऱ्यांना द्यावी, अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली. त्यादृष्टीने अधिकृत परवाना देण्याबाबत सकारात्मक असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यातील काजू बोंड खरेदीची परवाने मिळाल्यास शेतकऱ्यांना बोंडांपासून देखील उत्पन्न मिळणार आहे.

काजू बोंड खरेदीबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. अधिकृत परवाने देणार आहोत. गोवा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील काजूला १५० रुपये हमीभाव द्यावा, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यात येणार आहे.

- विलास सावंत, अध्यक्ष काजू, बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT