Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton MSP : कापसाला १२ हजार हमीभाव द्या

यंदा देशात कापूस लागवडी वाढली. तेलंगणातही कापसाखालील क्षेत्र वाढून २० लाख हेक्टरवर पोचले. मात्र शेतकऱ्यांना कापूस शेतीतून मिळणारा मोबदला घटला. कापूस बियाणे, खते आणि कीटकनाशकांचे दर सतत वाढत आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणेः मागील काही वर्षांपासून कापूस पीक (Cotton Crop) शेतकऱ्यांसाठी तोट्याचं ठरत आहे. पिकाचा उत्पादन खर्च (Cotton Production Cost) वाढला. त्यातच पाऊस आणि कीड-रोगामुळे होणारे नुकसान (Cotton Crop Damage) वाढले. त्यामुळे उत्पादन (Cotton Production) घटले. या परिस्थितीत सध्याच्या हमीभावातून उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे कापसाला किमान १२ हजार रुपये क्विंटल हमीभाव (Cotton MSP) जाहीर करावा, अशी मागणी तेलंगणामधील शेतकऱ्यांनी केली आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकरी तीन दिवस निदर्शने करणार आहेत.

यंदा देशात कापूस लागवडी वाढली. तेलंगणातही कापसाखालील क्षेत्र वाढून २० लाख हेक्टरवर पोचले. मात्र शेतकऱ्यांना कापूस शेतीतून मिळणारा मोबदला घटला. कापूस बियाणे, खते आणि कीटकनाशकांचे दर सतत वाढत आहेत. तर कापूस वेचणीसाठीची मजुरीही मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातच पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींनी होणारे नुकसान वाढले. शेतकऱ्यांना एकरी केवळ ४ ते ५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आव्वाच्या सव्वा वाढला. मात्र सरकारने कापसाच्या हमीभावात तुटपुंजी वाढ केली. यंदा कापसाला ६ हजार ८० रुपये हमीभाव सरकारने जाहीर केला. या हमीभावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नाही. कारण शेतकऱ्यांना एक क्विंटल कापूस उत्पादनासाठी जवळपास ८ हजार रुपये खर्च यतो. म्हणजेच सध्या कापूस उत्पादकांना क्विटंलमागे २ हजार रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे कापूस पीक तोट्याचं ठरून कापूस उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.

कापूस उत्पादकांना उत्पादन खर्च निघून किमान चार पैसे मिळावे यासाठी सरकारने किमान १२ हजार रुपये हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी तेलंगणामधील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी तेलंगणा रयतु संघम संघटनेच्या नेतृत्वात २९, ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी राज्यभर तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे.

दुसरीकडे सध्या कापूस दर दबावात आहेत. सध्या देशात कापसाला किमान ७ हजार ५०० रुपये तर कमाल ९ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळतोय. बाजारात कापसाची मागणी वाढल्यानंतर दर सुधारतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी ९ हजार रुपयांची दरपातळी लक्षात ठेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करणं फायदेशीर ठरेल, असं जाणकारांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price: देशात कापसाचे दर नरमले

Maharashtra GSDP: राज्याचे स्थूल उत्पन्न होणार वर्षातून दोन वेळा प्रकाशित

Crop Compensation Issue: सुधारित पीकविमा योजनेमुळे भरपाईला ठेंगा

Fertilizer Shortage: देशातील खत टंचाईमुळे आयातीच्या हालचालींना जोर

Maharashtra Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT