Ginger Cultivation Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Cultivation : आल्याच्या लागवडीस गती

Ginger Rate : तापमानात झालेल्या वाढीमुळे आले लागवड अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झाली नसली, तरी पूर्वमोसमी पावसामुळे सध्या सातारा जिल्ह्यात आले लागवडीस वेग आला आहे.

विकास जाधव 

Satara News : तापमानात झालेल्या वाढीमुळे आले लागवड अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झाली नसली, तरी पूर्वमोसमी पावसामुळे सध्या सातारा जिल्ह्यात आले लागवडीस वेग आला आहे. आले पिकाच्या दरात स्थिरतेमुळे जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या १५ ते २० टक्के क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्याच्या सातारा, कऱ्हाड, खटाव, कोरेगाव तालुक्यांत सर्वाधिक शेतकरी आले पीक घेतात. आले पिकाच्या दरात गेल्या दोन वर्षांपासून प्रतिगाडी (५०० किलो) ३० हजार ते ७० हजारांपर्यंत दर गेले होते. सध्या आले पिकास ४८ हजार ते ५२ हजार रुपये प्रतिगाडी दर मिळत आहे.

एप्रिल ते मेच्या सुरुवातीस ४० अंश सेल्सिअस तापमान गेल्याने आले लागवड वेळेत होणार नसल्याचा अंदाज होता. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आले लागवड करण्याची पंरपरा आहे. मात्र या कालावधीत तापमान वाढ व पाणीटंचाईचे संकट असल्याने शेतकऱ्यांकडून लागवड करण्याचे टाळले.

१५ मेपासून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यामुळे तापमान कमी होण्यास मदत झाली. यामुळे २० मेपासून लागवड करण्यास प्रारंभ झाला. पूर्वमोसमी पावसामुळे जमिनीतील तापमान कमी झाल्याने आले लागवडीस पोषक वातावरण झाले आहे. यामुळे सध्या लागवडीस वेग आला आहे. एकूण क्षेत्राच्या ४० टक्के लागवडीची कामे उरकली आहेत.

जिल्ह्यात सरासरी अडीच ते तीन हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड होत असते. गेली दोन वर्षे आले पिकांचे दर प्रतिगाडीला ३० हजारांपासून ७० हजार रुपये या दरम्यान राहिल्याने लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. असेच वातावरण राहिल्यास १५ जूनपर्यंत आले लागवडीची कामे उरकण्याची शक्‍यता आहे.

बियाण्यास विक्रमी दर

आले लागवडीसाठी साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत काढणी केलेले बियाणे वापरले जाते. नवीन लागवडीसाठी लागणाऱ्या आले बियाण्याची शेतकऱ्यांकडून खरेदी करून ठेवण्यात आली आहे.

आले पिकांस दर समाधानकारक राहिल्याने बियाण्याचे दरही वाढले होते. इतिहासात पहिल्यांदाच बियाणे दर प्रतिगाडी (५०० किलो) ५० ते ५२ हजारांवर गेले होते. हे दर टिकून राहतील या आशेवर शेतकऱ्यांनी चढ्या दरानेही बियाणे खरेदी केली आहे. परिणामी, एकूण क्षेत्रात १५ ते २० टक्के वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT