Ginger Cultivation : सुनियोजित आले लागवडीतून विक्रमी उत्पादन शक्य : सोनावले

Ginger Farming : आले पीक नाजूक असल्याने किमान ३५ सेल्सिअस तापमान असताना लागवड करावी. तापमान कमी करण्यासाठी आले लागवडीनंतर सुरुवातीच्या दिवसांत ठिबक सिंचन बरोबरच सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.
Ankush Sonavle
Ankush SonavleAgrowon

Satara News : आले पीक नाजूक असल्याने किमान ३५ सेल्सिअस तापमान असताना लागवड करावी. तापमान कमी करण्यासाठी आले लागवडीनंतर सुरुवातीच्या दिवसांत ठिबक सिंचन बरोबरच सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. मॉन्सून चाहूल लागल्यावर १५ जूनपर्यंत लागवड करावी. सुनियोजित आले लागवडीतून विक्रमी उत्पादन शक्य असल्याचे कृषी विभागाचे विषयतज्ञ अंकुश सोनावले यांनी व्यक्त केले.

वाठार (ता. कोरेगाव) येथे दैनिक अॅग्रोवन व रिवुलिस इरिगेशन प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमानाने आले पिकावरील ‘अॅग्रोवन संवादा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सह्याद्री कारखान्यांचे संचालक संभाजी गायकवाड, प्रगतिशील शेतकरी अमोल भोसले, अमर गायकवाड, रिवुलिसचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नितीन जाधव,

Ankush Sonavle
Ginger Cultivation : बेण्याचे भाव वाढल्यामुळे आले लागवड घटणार?

विभागीय व्यवस्थापक सागर पिसे, जिल्हा व्यवस्थापक सूरज फरकुटे, वितरक सुधीर गायकवाड, वितरण प्रतिनिधी दत्तात्रय जाधव, पंढरीनाथ गायकवाड, राहुल देशमुख उपस्थित होते. श्री. सोनावले पुढे म्हणाले, की आले लागवड करण्याऱ्या क्षेत्रातची माती व पाणी परीक्षण करून जमिनीची निवड करावी.

Ankush Sonavle
Ginger Seeds Procurement : आले बियाण्याची खरेदी एप्रिलअखेर सुरू राहणार

आले पिकास हरभरा पिकांचा निवड उपयुक्त ठरतो. गादीवाफ्याची लांबी दीडशे ते दोनशे फुटांच्या वर नसावी. कच्चे शेणखत घातक असल्याने कुजवून व प्रक्रिया करून वापरावे. कंदकुंज व कंदमाशी नियंत्रणासाठी जिवामृत व जैविक पद्धतीचा वापर करावा. सुडौमोनस, मेटारायझिंयम, मायकोरायझा जिवाणू आळवणी दर दहा दिवसाच्या अंतराने करावी.

शेतकरी उत्पादक कंपनी ने आले उत्पादक संघ तयार करून आले निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावा. अन्नप्रक्रिया योजनांचा लाभ घेऊन तरुण शेतकऱ्यांनी आले प्रक्रिया युनिट स्थापन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नितीन जाधव यांनी आले पिकांसाठी पाणी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करत रिवुलिस कंपनी शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या योजना व कंपनीच्या विविध उत्पादनाची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com