Ginger Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Farming: पावसामुळे सातारा जिल्ह्यातील आले लागवड रखडणार

Agriculture Struggle: सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आले आणि हळद पिकांची लागवड रखडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागणार आहे.

विकास जाधव 

Satara News: सातारा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतात पाण्याचे पाट वाहत आहेत. शेतात पाणी साचले असून, पुढील किमान १५ दिवस शेतात काहीही कामे करणे शक्य होणार नसल्याने जिल्ह्यातील नगदी पीक असलेल्या आले पिकांची रखडणार आहे. दरातील घट आणि आता पाऊस यामुळे आले पिकांच्या क्षेत्रातही घट होणार आहे.

जिल्ह्यात मागील तीन वर्षांत आले पिकांच्या दरात समाधानकारक परिस्थिती राहिली होती. यंदा मात्र आले पिकाच्या दराची नीचांकीकडे वाटचाल सुरू आहे. आले पिकास प्रति क्विंटलला १२०० ते १४०० रुपये दर मिळत आहे. कमी दरातही शेतकरी आले पीक देण्याच्या मानसिकतेत असतानाही व्यापाऱ्यांकडून मात्र आले खरेदी करण्याकडे कल कमी झाला आहे. ऊस आंतरपीक असलेल्या शेतात तर आले खरेदी पूर्ण बंद असल्याने शेतकऱ्यांकडून स्वतः आले काढून मार्केटला पाठविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नवीन आल्याचे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आले लागवड करण्याची पंरपरा आहे. यंदा अक्षय तृतीया एप्रिलमध्ये आली, त्यावेळी ४० अंश सेल्सिअस तापमान असल्याने लागवड होऊ शकली नव्हती. मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. यामुळे आले लागवडीपूर्वी करण्यात येणारी मशागतीची कामे करता आलेली नाहीत. तसेच हा पाऊस लांबलातर आले उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

एकूणच या पावसामुळे आले मशागत तसेच आले लागवड होणार नाही. काही शेतकरी मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहापासून लागवडीचे नियोजन करतात. या वेळी तापमानातील वाढीमुळे लागवड करता आलेली नाही. बहुतांश शेतकरी वातावरण पाहून साधारणपणे १५ मेपासून १५ जूनपर्यंत लागवड केली जात असल्याने ८० ते ९० आले लागवड पूर्ण होते. मात्र हाच काळ पावसामुळे वाया जात असल्याने लागवडीचा पोषक काळ वाया जाणार आहे. परिणामी, दरातील घट आणि सुरू असलेला पाऊस यांचा परिणाम क्षेत्रावर होणार आहे.

हळद लागवड रखडणार

जिल्ह्यातील हळद लागवडीसाठी शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पूर्वतयारी केली आहे. जिल्ह्यात २३०० ते २४०० हेक्टर हळद लागवड होते. यामध्ये सर्वाधिक वाई, सातारा, कऱ्हाड कोरेगाव या तालुक्यांत असते. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर हळद लागवड केली जाते. मात्र वाढलेले तापमान आणि सुरू असलेला अतिरिक्त पावसाचा फटका हळद लागवडीवर झाला आहे. यामुळे हळद लागवड किमान १५ ते २५ दिवस लांबणीवर गेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar: शेतीशी संबंधित कर्ज १०० टक्के माफ करा, शरद पवारांची मागणी, दुष्काळी पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद

Sugarcane Crushing Season: चांगला साखर उतारा मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?

Roll Revision Protest: ‘एसआयआर’ प्रक्रिया थांबवा : डाॅ. अजित नवले

Tomato Farming Success Story: टोमॅटो शेतीतून प्रगती गाठलेले बोरीबेल

Drought Management: सरपंचांनो, गावाचा ताळेबंद मांडा..

SCROLL FOR NEXT